नाताळसाठीच्या वाढत्या मागणीमुळे कैद्यांवर १२-१२ तास काम करण्याची पाळी

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी विविध सजावटीच्या साहित्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या केकनी बाजार सजला असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचीही नाताळसाठी लगबग सुरू आहे. ही लगबग कारागृहातील नाताळ जल्लोशात साजरा करण्यासाठी नव्हे, तर बाजारातून वाढलेली केकची मागणी पूर्ण करण्यासाठीची आहे. नाताळच्या निमित्ताने कैदी मोठय़ा प्रमाणावर केक तयार करतात. गेल्या वर्षी या कैद्यांनी तब्बल ११८० किलो स्पंज केक आणि ११ हजार ८८० कपकेक बनवून विक्रीसाठी पाठवले होते. मात्र यंदा त्याहीपेक्षा जास्त मागणी असल्याने या कैद्यांना सध्या १२ तास काम करावे लागत आहे.

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना चांगल्या कामात व्यस्त ठेवण्याच्या हेतूने सुरू असलेल्या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. शिक्षा भोगून कैदी बाहेर पडल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून त्यांना बेकरी प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना विणकाम, हस्तकला, सुतारकाम, शेती आदी कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. सध्या ठाणे कारागृहातील १३ कैदी बेकरी उत्पादन उपक्रमामध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी ४ कैदी कुशल, १ अर्धकुशल तर ८ कैदी अकुशल गटात मोडतात.

सणांच्या काळात येथील बेकरीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थाना मोठी मागणी आहे. दिवाळीत फराळाचे विविध पदार्थ हे कैदी तयार करतात. त्याचप्रमाणे नाताळसाठी स्पजंकेक, कपकेक, पाइनअ‍ॅपल केक, चॉकलेट केक  असे विविध चविष्ट केक  येथे तयार केले जातात. दक्षिण क्षेत्रातील भायखळा कारागृह, मुंबई मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा  मध्यवर्ती कारागृह, तळोजा कारागृह, तसेच फ्रीडम फाउंडेशन, सीड्स ऑफ होप फाउंडेशन आदी संस्थांकडून या पदार्थाना अधिक मागणी आहे. यंदा  रविवारी साजऱ्या होणाऱ्या नाताळ सणानिमित्त १ हजार ४५० किलो स्पंज केक तर १५ हजार नग कपकेकची मागणी ठाणे कारागृहाकडे आली आहे. स्पंज केक-१५० रुपये किलो, कपकेक-७ रुपये नग, अननस केक-३८० रुपये किलो तर चॉकलेट केक- ४५० रुपये किलोने विक्री केला जातो. यंदा आलेल्या मागणीनुसार ४ लाखांहून अधिक उत्पन्न ठाणे जिल्हा कारागृहाला मिळणार असल्याची माहिती ठाणे कारागृहाच्या बेकरी निरीक्षक निशा नाईक यांनी दिली. गेल्या वर्षी ११८० किलो स्पंज केक आणि ११ हजार ८८० नग कपकेकची विक्री करण्यात आली. त्यातून कारागृहाला तब्बल ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती ठाणे कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. कैद्यांच्या दैनदिन कामाची वेळ सकाळी ७ ते ४ असते. मात्र नाताळच्या निमित्ताने केकची प्रचंड मागणी असल्याने कैद्यांनी रात्री १२ पर्यंत काम करण्याची मुभा कारागृह प्रशासनाने दिली आहे. कुशल कैद्यांना प्रतिदिन ५५ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ५० तर अकुशल कैद्यांना दररोज ४० रुपये एवढे भत्ता दिला जातो. सणानिमित्ताने कैद्यांना दुप्पट कमाई करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…

Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…

Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच

Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी

singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?

Queen Elizabeth II's wedding cake slice sold in auction
Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध?

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?