ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या एका प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलामुळे (आरपीएफ) जीवदान मिळाले आहे. आरपीएफच्या या कार्याविषयी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मी धावायला तयार.. रुग्णालयात उपचारासाठी दाखल विनोद कांबळी यांची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा – मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी

मूळचे उत्तरप्रदेश येथील रायबरेली भागात राहणारे ५४ वर्षीय प्रवासी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक सातवर उभे होते. त्यावेळी उद्योगनगरी एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी फलाट क्रमांक सातवर आली. रेल्वेगाडी सुटल्यानंतर तो प्रवासी त्या रेल्वेगाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याच्यासोबत मोठी बॅग होती. रेल्वेगाडीत प्रवेश करताना त्याचा तोल गेला आणि तो फलाट -रेल्वागाडीच्या पोकळीत सापडला. त्यावेळेस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान दीपक हड्डा आणि आर. के. मीणा हे फलाटावर तैनात होते. त्यांनी सतर्कता दाखवित प्रवाशाला पोकळीतून बाहेर काढून त्याचा जीव वाचविला. या घटनेनंतर प्रवाशाने रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांचे आभार मानले.