लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे: शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात ३० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर, ८ ठिकाणी पाणी साचले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन नागरिकांचे हाल झाले.
ठाणे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवार रात्र आणि गुरूवार सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मौसमातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षी म्हणजेच ४ जुलै २०२२ रोजी शहरात १४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी हा सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-ठाणे: घोडबंदर मार्गावरून शक्य असल्यास वाहतूक टाळा
मोठ्याप्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील ८ सखल भागांमध्ये पाणी साचले होते. वंदना सिनेमागृह, वृंदावन तसेच इतर भागांमध्ये पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन नोकरदार वर्गाचे हाल झाले. तसेच परिसरातील नागरिकांचे हाल झाले. पहाटेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे ३० ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर ३ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.