ठाणे: शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक गृहसंकुलांबाहेरील पिपांमध्ये कचरा ढिग लागत असतानाच, वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात असलेले कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवार पासून या परिसरात घंटा गाड्यांना प्रवेश देणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कचरा कोंडी होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात असलेल्या पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातील विविध भागातील कचऱ्याचे संकलन करुन त्याचे वर्गीकरण करण्यात येते. याठिकाणी कचऱ्याचे ढीग लावले जातात. हा ढीग दिवसेंदिवस वाढत असून या परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे येथील रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती,मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला असून परिसरातील रहिवाशी तसेच कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या दिवसात साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक असते आणि त्यात या कचरा हस्तांतरण केंद्रावर साचत असलेल्या कचऱ्याच्या ढीगमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अरुंद असलेल्या येथील रस्त्यांवरुन दिवसभर घंटा गाड्यांची वाहतुक सुरु असते. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा फटका या परिसरातून ये-जा करणाऱ्या टीएमटी बस गाड्यांना तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात, येथील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करुनही महापालिकेकडून यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र,यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे बचाटे यांनी सांगितले.

vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
mumbais air index moderate with bad air recorded in Shivdi Worli and bkc
शिवडी, वरळी बीकेसीत अशुद्ध हवा, मुंबईची हवा गुणवत्ता खालावली
issue in pimpri assembly constituency
गुन्हेगारी, अतिक्रमणे, अनारोग्य आणि प्रदूषण; वाचा कोणत्या मतदारसंघात आहेत ‘या’ समस्या

हेही वाचा : Illegal Chawls in Titwala : टिटवाळा उंभर्णी येथे बेकायदा चाळींची उभारणी करणाऱ्या भूमाफियावर गुन्हा दाखल

गेले दोन महिन्यांपासून कचऱ्याचा ढीग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना परिसरात वावरणे कठीण झाले आहे. याठिकाणी कचऱ्याचा ढीग आणखी वाढू नये यासाठी येत्या सोमवार पासून परिसरात घंटागाडीला आतमध्ये प्रवेश देणार नाही असा इशारा येथील रहिवाश्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे शहरातील कचरा कुठे जमा होणार असा प्रश्न निर्माण झाला असून पुन्हा एकदा शहात कचऱ्याची समस्या निर्माण होणार आहे.