खाद्य पदार्थांच्या वस्तू घरपोहोच करणाच्या (डिलीव्हरी बाॅय) बहाण्याने घरात शिरून चाकूचा धाक दाखवून एकाला लुटल्याचा प्रकार पाचपाखाडी भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पाचपाखाडी येथील एका इमारतीमध्ये ८९ वर्षीय व्यक्ती राहत असून त्यांचा सांभाळ करणारा एक तरुणही त्यांच्यासोबत राहतो. बुधवारी रात्री उशीरा एक व्यक्तीने त्यांचा दरवाजाची घंटी वाजविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कल्याणमधील नौदल संग्रहालयामुळे शिवाजी महाराजांच्या काळाला उजाळा; सेवानिवृत्त उप नौसेनाप्रमुख एस. व्ही. भोकरे यांचे प्रतिपादन

सांभाळ करणाऱ्या तरुणाने घरातूनच विचारले असता, त्याने डिलीव्हरी बाॅय असून जेवण देण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली. तरुणाने दरवाजा उघडला असता, त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून सुरक्षेसाठी बसविण्यात आलेला दरवाजा उघडण्यास सांगितला. तरुणाने तो दरवाजा उघडला असता, त्या व्यक्तीसह आणखी दोन व्यक्ती घरात शिरले. त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. परंतु काही आढळून आले नाही. त्यानंतर सांभाळ करणाऱ्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून तिघेही निघून गेले. त्याचवेळी त्यातील एक चोरटा पळण्याच्या प्रयत्नात जखमी झाला. इमारतीतील रहिवाशांनी त्याला ताब्यात घेतले. याघटनेप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.