ठाणे येथील किसन नगर, सावरकर नगर तसेच आणि मुंब्रा मार्केट भागातील महापालिका शाळांमध्ये व्होकार्ड फऊंडेशनच्या साहाय्याने ई-लर्निग क्लास सुरू करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये पुढील सहा महिन्यांत ई-लर्निग क्लास सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गुरुवारी किसन नगर आणि सावरकर नगर येथील शाळांमध्ये ई-लर्निग क्लास सुरू करण्यात आले. त्या वेळी व्होकार्ड फाऊंडेशनच्या अध्यक्षा नफीसा खुराकीवाला, शिक्षण समिती सभापती नरेश मणेरा, महापालिकेचे अधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना जयस्वाल यांनी पुढील सहा महिन्यांत महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये ई-लर्निग क्लास सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात व्होकार्ड फाऊंडेशनच्यावतीने किसन नगर, सावरकर नगर आणि मुंब्रा मार्केट येथील शाळांमध्ये सुरू होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा