ठाणे – येथील ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी अंटार्क्टिकातील  सर्वोच्य शिखर असलेले ‘माउंट विन्सन’ सर करून एक नाव विक्रम प्रस्थापित केला आहे. तर हा विक्रम करणारा भारतातील पहिले गिर्यारोहक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी उत्तर अमेरिकेतील अलास्का मधील ‘माउंट देणाली’ हे अत्यंत कठीण असणारे शिखर सर करणारा पहिला ज्येष्ठ गिर्यारोहक ठरलो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : कबुतराचा जीव वाचविताना अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी; सुरक्षिततेची साधने पुरवली नसल्यामुळे दुर्घटना झाल्याचा मनसेचा आरोप

‘माउंट विन्सन’ हे शिखर अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर आहे. माउंट विन्सन सर करण्यासाठी अनेक गिर्यारोहकांकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. या शिखराची उंची ४ हजार ८९२ मीटर  इतकी असून अतीशय थंड आणि सतत बदलणारे लहरी हवामानाचा गिर्यारोहकांना सामना करावा लागतो. तसेच उणे ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असणाऱ्या तापमानात गिर्यारोहकांना लो कँप वरून हाय कँप कडे जाताना सुमारे एक किलोमीटर पेक्षा उंच असलेली  बर्फाची उभी भिंत तांत्रीक पद्धतीने सर करावी लागते.  या सर्व गोष्टी शरद कुलकर्णी यांच्यासाठी  आव्हानात्मक होत्या. त्यात चढाईच्या दोन दिवस आधीच प्रचंड बर्फाचा वादळामुळे त्यांचे दोन दिवस वाया गेले होते. मात्र त्यानंतर मोहिम पुर्ण करेपर्यंत हवामानाने चांगली साथ दिल्याने त्यांनी यशस्वीरीत्या शिखर सर केले. 

हेही वाचा >>> ठाणे : सावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का? डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला प्रश्न

शरद कुलकर्णी आणि त्यांची पत्नी अंजली कुलकर्णी  यांनी जगातील सात खंडातील सात सर्वोच्य शिखरे ‘सेवन समिट ‘  सर करण्याचे ठरविले होते.  मात्र २०१९ मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर करताना ऑक्सीजनच्या कमतरते अभावी त्यांची पत्नी अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला होता. त्या मानसिक धक्यातून सावरत शरद कुलकर्णी यांनी उरलेली चार शिखरे सर करून आपल्या पत्नीला आदरांजली वाहण्याचा निश्चय केला होता. यानुसार कुलकर्णी यांनी ‘माउंट विन्सन’ शिखर सर केले. या आधी त्यांनी नेपाळ मधील माऊंट लोबुचे, मेरा पीक तसेच भारतातली हनुमान टिब्बा, स्तोक कांगरी ही शिखरे यशस्वी रित्या सर केली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane sharad kulkarni successfully climb mount vinson in antarctica zws