ठाणे : वर्तकनगर येथील एका बंद पडलेल्या कंपनीतील जागेवर बांधकामाच्या ठिकाणी कामे मिळावी यासाठी शिंदे गटामधील आमदार प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या समर्थकांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेत असल्याचे दोघांचेही समर्थक म्हणत असले तरी कंत्राट मिळविण्याच्या कारणावरून हा वाद सुरु असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी याच कंपनीतील कामे मिळविण्यासाठी दोन्ही समर्थकांमध्ये वाद उफाळून आले होते. याप्रकरांमुळे शिंदे गटामधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी कंपनीत माल वाहून नेणारा एका वाहनाचीही तोडफोड झाली. याप्रकरणात चालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सरनाईक समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर येथील एक बंद पडलेली खासगी कंपनी असून त्याठिकाणी विकासकाच्या माध्यमातून इमारत बांधकाम सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले होते. तसेच मुंबईतील गिरणी कामागारांप्रमाणे ठाण्यातही बंद पडलेल्या कंपनीतील कामगारांना घरे मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील कर थकबाकीदारांसाठी अभय योजना

त्यानंतर लोकमान्यनगर भागातील माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी कंपनीच्या आवारात कार्यकर्त्यांसह जमून घोषणाबाजी केली. आम्ही स्थानिक असून दोन वर्षापूर्वीच येथील बांधकामासाठी लागणारे कंत्राट घेतल्याचा मुद्दा बारटक्के यांनी उपस्थित केला होता. तसेच आम्ही स्थानिकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे सरनाईक आणि बारटक्के यांच्या समर्थक एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरु होते. शुक्रवारी सरनाईक यांचे समर्थक कंपनीच्या बाहेर जमले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा असा मुद्दा उपस्थित केला. तर बारटक्के समर्थकांनी आम्हाला रोजगार मिळालेला आहे. असे असताना काहीजण कामांमध्ये खोडा घालत गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला

स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी हा वाद कंत्राट मिळविण्याच्या वादातून सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान, येथील बांधकामासाठी एक वाहन जात होते. हे वाहन अडवून त्याची तोडफोड करण्यात आली. हे वाहन फोडल्याप्रकरणी सरनाईक यांच्या समर्थकांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरनाईक विरुध्द बारटक्के

लोकमान्यनगर भागात बारटक्के हे पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत एकाच प्रभागात नगरसेवक होते. बारटक्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सरनाईक आणि बारटक्के यांच्यामध्ये पूर्वीपासूनच मतभेद असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर याला विराम लागेल अशी अपेक्षा असताना त्यांच्यात पुन्हा वाद पेटल्याचे दिसत आहे.

Story img Loader