ठाणे : पाच दिवसांपूर्वी उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदेची निघृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे या महिलांचा नाहक बळी गेला आहे. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. परंतू, अजूनही सरकारला जाग आलेली नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने दिला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळी फीत लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला.

राज्यात सध्या कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे गुन्हेगार राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत, अशी टिका त्यांनी यावेळी केली. अशा गुन्हेगारांचा खटला फास्टट्रॅक वर चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला असुरक्षित आहेत. राज्याचे गृहखाते आणि पोलीस यंत्रणा काय करत आहेत? असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. अपुऱ्या पडणाऱ्या पोलीस मनुष्यबळामुळे पोलीस खाते हतबल झाले आहे.

emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सिंह यांचा राजीनामा घेणेच हिताचे
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
Eknath Shinde announcement in the meeting of government officers employees organizations regarding pension
निवृत्तिवेतनासाठी सर्व पर्याय खुले; शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

हेही वाचा…डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी पालिकेची संयुक्त मोहीम, रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त

प्रामुख्याने ठाण्यातील पोलिसांचा मनुष्यबळ सत्तेतील राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना सुरक्षा देण्यात व्यस्त असल्याने महिलांचे मंगळसूत्र चोरी, छेडाछेडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यासाठी पोलिसांचा मनुष्य बळ सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांकडून आणि गुंडांकडून काढून घेऊन २४ तास रस्त्यावर पोलिसांचे ग्रस्त पथक वाढविण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्याकडून करण्यात आली आहे.