खरेदीच्या आनंदाबरोबर बक्षिसे जिंकण्याची संधी

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला’ आजपासून सुरुवात होत असून या खरेदी महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील अनेक गृहपयोगी वस्तूंच्या दुकानांनी या खरेदी उत्सवात सहभाग दर्शवला आहे.

Innovation City
गिफ्ट सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही होणार ‘Innovation City’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 

खरेदीसाठी गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकांना आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी घेऊन येणाऱ्या लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे यंदाचे सहावे पर्व आहे.  यंदाच्या वर्षी या महोत्सवाच्या आयोजनात ठाणे महापालिकेचेही सहकार्य लाभणार असून यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाची पर्वणीही ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी झालेल्या वेगवेगळ्या दुकानात खरेदी केल्यावर ग्राहकांना दररोज एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर आणि रेफ्रीजरेटर यांसारखे आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहे. हा उत्सव येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सफर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळेल.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिलासह कूपन दिले जाईल. ते  कूपन भरून दुकानातील ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.

* ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

* या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

* महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क :  कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१, गोविंद भोसले- ९८१९८१४२५३, अतुल जोशी- ९८२१४७५९१९ (नवी मुंबई)

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डिजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजीटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी आणि लीनेन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा, दीपक टूर्स हे प्लॅटीनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अँड सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत.

Story img Loader