ठाणे येथील सेन्ट्रल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तिसाव्या डॉ. श्रीधर देशपांडे वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने पदार्पणातच यजमान स्पोर्टिग क्लब कमिटी संघाचा तीन धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने ४५ षटकांत ९ बाद २३० धावा केल्या. सिद्धेश नातालकर याने ४२ तर संजय संसारे आणि हेमंत बुचडे यांनी अनुक्रमे ३० आणि २७ धावा केल्या. स्पोर्टिग क्लब कमिटी संघाच्या ओनिनदर गिल याने ७ षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. स्पोर्टिग क्लब कमिटीने अतिशय सुरेख खेळ करत हा सामना अटीतटीचा केला. मात्र त्याला पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना ४५ षटकांत ८ बाद २२७ करता आल्या. विशाल जैन याने ५१ धावा तर अर्जुन शेट्टी ४९ आणि ओनिन्दर गिल याने ४६ धावांची खेळी केली. एकनाथ शिंदे क्रिकेट संघाचा गोलंदाज विकास रेपाळे यांनी ८ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात २ तर निखिल बागल याने ६ षटकांत १६ धावा देत २ गडी बाद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा