आशियाई पॉवरलििफ्टग स्पर्धा 

प्रशांत घोडविंदे (युवा वार्ताहर)

उदयपूर येथे पार पडलेल्या आशियाई पॉवरलििफ्टग स्पर्धेत जीवनदीप महाविद्यालयाच्या श्रुती तरे या विद्यार्थिनीने रौप्यपदक पटकावले. ५२  किलो वजनाच्या गटात बेंचप्रेस प्रकारात श्रुती तरेने यशस्वी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये १८ देशांतील २०० खेळाडू सहभागी झाले होते.

कल्याण तालुक्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलििफ्टग स्पर्धेत पदक पटकावणारी श्रुती ही पहिलीच विद्यर्थिनी ठरली आहे. महाविद्यालयाचे प्रशिक्षक प्रा.सुरेश चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या श्रुतीने यापूर्वी विद्यापीठ, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलििफ्टग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अनेक स्पर्धामध्ये यश संपादन करत श्रुतीने पदके आणि स्ट्राँग वुमन किताब पटकावले आहेत.

ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुविधांचा अभाव असूनही आपल्या जिद्दीने श्रुतीने हे यश संपादित केले आहे. पॉवरलििफ्टग स्पर्धेत भारताचे नेतृत्व केल्याचा तिला अभिमान आहे. ग्रामीण भागातील मुलींना खेळात सहभागी करण्यात त्यांचे पालक उत्सुक नसतात, परंतु आई- वडिलांनी केलेले सहकार्य

आणि प्रशिक्षक प्रा. सुरेश चेडे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करू शकल्याचे श्रुती तरेने सांगितले. ग्रामीण भागातील मुलींचा खेळात सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची श्रुतीची इच्छा आहे.

राज्य अ‍ॅथलेटिक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडू अव्वल

महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी पुरुष आणि महिला गटात चार वैयक्तिक व एक सांघिक पदकांची भर आपल्या पारडय़ात पाडली. महिला गटात २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अक्षया अय्यरने २५.७ सेकंदात प्रतिस्पध्र्याना मागे टाकत सुवर्णपदक मिळविले. त्याचप्रमाणे संजना लहानगे हिनेही ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाची भर केली. दिपू नानू याने ८००मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळवीत प्रेक्षकांची वाहवा मिळवून १ मिनिट ५६.७ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली तर दर्शन देवरुखकरने भर उन्हात आपला पूर्ण शारीरिक कस लावत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले. ४०० मीटर रिले शर्यतीत पुरुष गटात दर्शन, शाबाज, अजित व दिपू यांनी रौप्यपदक पटकाविले. खेळाडूंच्या देदीप्यमान कामगिरीमुळे ठाणे जिल्ह्य़ातील खेळाडूंच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. तसेच ठाण्याच्या गौरांग आंब्रेने २०० मीटर धावण्याची स्पर्धा २१.८ सेकंदात  पार कडून मुंबई शहराला सुवर्ण पदक मिळवून दिले.

श्रद्धा घुलेची ‘सुवर्ण’ उडी

पुण्यातील बालेवाडी येथे १२ व १३ जून रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्हा संघाने महिला गटाच्या ४०० मी. रिले स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक मिळवले तर पुरुष गटात दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक पटकावले. श्रद्धा घुलेने लांब उडीत आपले वर्चस्व कायम करीत सुवर्णपदक पटकावले तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. पुरुष गटात तेजस सॅलीयनने ६.९८ लांब उडी मारून रौप्यपदक मिळविले. ४०० मीटर धावणे पुरुष गटात दिपू नानू याने ४८.६ सेकंद ही वेळ नोंदवीत कांस्यपदक मिळविले. थाळी फेक महिला गटात ३५.०८ मीटर थाळी फेकून सुवर्ण  व १०.६२ गोळा फेक करून कांस्यपदक अशी दुहेरी कामगिरी ठाणे जिल्ह्यासाठी केली. श्रद्धाचे प्रशिक्षक नीलेश पातकर यांनी खेळांडूचे कौतुक केले.

एक रात्र धावपटूंसाठी..

‘रनटॅस्टीक दिलसे’ या संस्थेतर्फे ठाण्यात रविवारी मध्यरात्री धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ३०० धावपटूंनी भाग घेतला होता. रात्रीची ही स्पर्धा धावपटूंसाठी आव्हानात्मक ठरली. हिरानंदानी मेडोजपासून ही स्पर्धा सुरू झाली. तुलनेने प्रदूषण कमी असते. वाहतुकीचा त्रासही होत नाही. धावपटू घामाघुम होत नाहीत, त्यामुळे रात्री स्पर्धा घेतल्याचे संस्थेचे पदाधिकारी बरी नायर यांनी सांगितले.

यंग गन्स चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा उत्साहात

ठाणे येथील न्यू हॉराईजन या शाळेच्या पटांगणात रंगलेली यंग गन्स चॅम्पियनशिप ही फुटबॉलची स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १० वर्षांखालील मुलांमध्ये बीबीएफएस या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर १३ वर्षांखालील मुलांमध्ये संडे बॉइज, १५ वर्षांखालील मुलांमध्ये युथ सोकर अ‍ॅकॅडमी, तर १७ वर्षांखालील मुलांमध्ये यंग गन्स या संघांनी प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.  १० वर्षांखालील मुलांमध्ये यंग गन्सच्या मिहीर मोहिते याला सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. १३ वर्षांखालील मुलांमध्ये लेसली या संघातील तनिष्क आणि १५ वषार्र्खालील मुलांमध्येही याच संघातील दुर्वेश याग्नीक याची सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. १७ वर्षांखालील मुलांमध्ये फ्रेंड्स युनायटेडच्या साहील याला सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग दर्शवला होता. मुंबई फुटबॉल संघाचे प्रशिक्षक अर्शद हुसेन आणि रीजेन्ट होंडाचे साईनाथ आदी मान्यवर उपस्थित होते.

जलतरण स्पर्धा उत्साहात पार

डोंबिवली येथील यश जिमखान्याच्या वतीने गेल्या रविवारी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक गटात हर्षल डुंबरे आणि अरुण कर्णिक यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले तर ज्येष्ठ नागरिक महिला गटात वीणा कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष मुलांच्या गटात ईशा दामले हिने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. मुलांच्या गटात ओमकार कुलकर्णी तर मुलींच्या गटात सुरशती कदम यांनी प्रथम क्रमांक पटकविला. या स्पर्धेत २३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे विशेष म्हणजे अपंग मुलांमुलीनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. मुलांसोबतच त्यांच्या पालकांना व घरातील ज्येष्ठांनाही सहभागी करून घेतले होते. विजेत्यांना डॉ.अरविंद बेंगेरी व युवक वडनेरकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

Story img Loader