राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसगाडीचा एका टांग्याला धक्का लागल्याने टांगा मालकाने त्याच्या मुलांसह एसटी चालकाला काठीने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फुलचंद जैस्वार आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फुलचंदला अटक केली आहे.

एसटी चालक नितेश नवकर हे बसगाडी घेऊन तलावपाली परिसरातून जात होते. त्याचवेळी एका टांग्याला त्यांच्या बसगाडीचा धक्का लागला. या घटनेनंतर टांग्याचे मालक फुलचंद आणि नितेश या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून फुलचंद आणि त्यांच्या दोन मुलांनी नितेश यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. याप्रकरणी नितेश यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फुलचंद यांना अटक केली आहे.

Story img Loader