ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. या मतपेट्या विविध स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्राँग रुम भोवती सुरक्षा यंत्रणांचे त्रिस्तरीय बंदोबस्त नेमण्यात आला आहे. बंदूकधारी पोलीस अधिकारी आणि जवानांकडून या स्ट्राँग रुमची देखरेख करण्यात येत आहे. तसेच स्ट्राँग रुमच्या आवारात सीसीटीव्हीचे जाळेही बसविण्यात आले आहे. मतमोजणीच्या कालावधीत अधिकृत व्यक्ती वगळता इतरांना मतमोजणी केंद्रावर प्रवेशबंदी असणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी महावितरणचे कर्मचारी देखील सावध आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज, शनिवारी होणार आहे. बुधवारी मतदान झाल्यानंतर या मतपेट्या विविध ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्ट्राँग रुम भोवती त्रिस्तरीय सुरक्षा कड्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच, ज्या ठिकाणी स्ट्राँग रुम आहेत. त्याठिकाणी पहिल्या कड्यामध्ये केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाचे जवान, दुसऱ्या कड्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तर, तिसऱ्या आणि शेवटच्या कड्यामध्ये स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तसेच स्ट्राँग रुममध्ये कोणीही घुसखोरी केली नसल्याची माहिती उमेदवार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

हेही वाचा – ‘समृध्दी’ची शहापूर-आमणे महामार्गावरील कामे शेवटच्या टप्प्यात

स्ट्राँग रुमच्या आवारात तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने महावितरण कंपनीने विद्युत बिघाड होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. मतमोजणीच्या दिवशी कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्राजवळ गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत व्यक्तीवगळता इतरांना मतमोजणी केंद्राच्या काही मीटर अंतरापर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. मतमोजणीची माहिती कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी देखील आसन तसेच इतर व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane three layer security around the strong room tight deployment of local police along with central armed forces ssb