खरं सांगू, लघुपटाचा केंद्रबिंदू असणारा, लघुपटाची ओळख करून देणारा, लघुपटाचा विषय फुलवणारा ‘बोलता’ माणूस शोधणं, हे माझ्यासाठी आव्हान असतं.’’ लघुपटनिर्मितीचा आपला प्रवास उलगडून दाखवताना ऋचा हुशिंगने आपली ‘मन की बात’ पटकन सांगितली.
‘कायद्याचं बोला’ हा आनुवंशिक वारसा जपण्याचा कायदा न पाळता ऋचाने वेगळ्या अनवट वाटेकडे मोर्चा वळवला. ‘खेळ’कर स्वभावामुळे बॉक्सिंग करण्यासाठी ती मैदानात उतरली. स्टेट लेव्हलवर पाच सुवर्णपदकं आणि एक नॅशनल ब्रॉन्झपदक तिने आपल्या नावावर नोंदवले. रुईयामध्ये मास मीडिया या विषयात पदवी संपादन करत असतानाच लघुपट निर्मितीचा विचार तिच्या मनात पक्का झाला. त्या दिशेने पावलं टाकत पुण्याच्या एफटीआयआयमध्ये दिग्दर्शनाचा एक वर्षांचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. या प्रशिक्षणाच्या काळात छायाचित्रणाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणाऱ्या ऋभु लाहा या बंगाली युवकावर ऋचाचे मन जडले. मनातील विचारांना, भावनांना, निरीक्षणांना, कल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्याचे ‘स्वातंत्र्य’ देणारे लघुपट तयार करणे हेच दोघांचेही ध्येय होते. साहजिकच हातात हात घालूनच पुढची वाटचाल करण्याचा निर्णय झाला. सुदैवाने तिचा सहचर ऋभु छायाचित्रकाराच्या भूमिकेतून सतत तिच्या सोबत असल्यामुळे वेळेचं बंधन (सुरक्षिततेच्या दृष्टीने) गळून पडलं. त्यामुळे लघुपटनिर्मितीला वेगाने धुमारे फुटले. दोघांनाही सामान्य माणसातल्या ‘असामान्यत्वाचे’ आकर्षण होते. भटकण्याची आवड होती, निरीक्षणाची सवय होती. जाणिवांची क्षितिजं विस्तारलेली होती. भावनांची खोली होती. वेगवेगळ्या ‘पर्यावरणात’ राहणाऱ्या माणसांना समजून घेण्याची आत्यंतिक ओढ होती. आपल्या प्रेमकहाणीच्या पाश्र्वभूमीवर, शहरी तरुणांचे प्रेम आणि लग्न याविषयी प्रश्न उपस्थित करणारा ३० मिनिटांचा लघुपट ‘लव्ह साँग’ दोघांनी पडद्यावर आणला. घर आणि व्यवसाय या दोन्ही आघाडय़ांवर संसारात पदार्पण केले.
२००७ पासून पायाला भिंगरी लागली आणि मनातले विषय पडद्यावर सजू लागले. धारावी वसाहतीतील विविध उद्योगधंद्यांनी माहितीचा खजिना उघड केला. एनजीओच्या सूचनेवरून, गुजरातमधील पाच आदिम जाती-जमाती पडद्यावर अभ्यासपूर्ण स्वरूपात सादर झाल्या. पूर्व महाराष्ट्रातील हळबाहळवी ही जमात आपल्या वैशिष्टय़ासह लोकांत मिसळली. देवराई हा भारतातील संपन्न सामाजिक परंपरेचा एक भाग आहे. स्थानिक आदिवासींनी देवराईंचे जतन केले आहे. ब्रिटिश काळापासून ताब्यात घेतलेल्या जंगलावर मालकी हक्क सांगण्यासाठी साधन म्हणून केलेल्या देवराईंच्या वापराचे सामाजिक आणि धार्मिक महत्त्वाच्या पलीकडे जाऊन राजकीय महत्त्वसुद्धा ‘देवराई’ हा चित्रपट शोधतो. महाराष्ट्र स्टेट फिल्म अ‍ॅवार्डने हा लघुपट गौरवला गेला. दोघे मिळून काम करत असले तरी ‘आपली आवड’ ही दोघांनी जपली आहे. इराण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१३ मध्ये, रेटरोस्पेक्टिव्ह (सिंहावलोकन) ऑफ इंडियन डॉक्युमेंटरीजमध्ये आठ माहितीपट निवडले गेले. त्यात धनंजय कुलकर्णी ‘चंद्रगुप्त’ हा ऋभूचा व डायरेक्टर पेंटर बाबूराव लाडसाहेब, हा ऋचाचा होता.
ठाण्याच्या पाचपाखाडी विभागातील उदयनगरमध्ये असलेल्या ऋचा आणि ऋभू यांचं आगळंवेगळं वैशिष्टय़पूर्ण काम म्हणजे फिल्म डिव्हिजनच्या सौजन्याने २०१० पासून चालू असलेला निकोबारी जीवनपट.  त्सुनामीच्या तडाख्याने नारळाची झाडे, घर व जमीन वाहून गेल्यामुळे विस्कळीत झालेलं निकोबारी जीवन, शासनाने पुढे केलेला मदतीचा हात आणि तो हात पकडताना आलेला अनुभव याचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे हा माहितीपट. या जोडगोळीच्या दृष्टीने तो एक प्रबंधाचाच विषय आहे. या माहितीपटासाठी दोघे घेत असलेले शारीरिक, मानसिक बौद्धिक श्रमही लक्षणीय आहेत. माहितीपटाचे अखेरच्या टप्प्यावरचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी ऋचा, ऋभू आणि त्यांचे सहकारी साडेतीन महिने, साडेचार महिने असे दोनदा निकोबार आणि त्याच्या बाजूच्या बेटांवर ठाण मांडून होते. निकोबारी लोकांची जीवनशैली जाणून घेताना त्यांच्यात आणि आपल्यात अंतर पडू नये, त्यांची सुखदु:खं, अडचणी आपल्याला समजाव्यात, नात्यात मोकळेपणा यावा, अभिव्यक्ती ही वास्तववादी व्हावी यासाठीच सगळा अट्टहास होता. दोन्ही मुक्कामात ऋचा आणि ऋभू यांची ९ महिन्यांची कन्या ‘चिकू’ ही त्यांच्या समवेत होती.

Applications of 12400 aspirants in 24 hours for CIDCOs Mahagrihmanirman Yojana
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
air pollution control, Mumbai Municipal Corporation,
वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
tirupati laddu quality improved devotees appreciate says cm chandrababu naidu zws
तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा! भाविकांकडून प्रशंसा : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा
maharashtra new housing policy to benefit builders
विश्लेषण : राज्याचे गृहनिर्माण धोरण विकासकांच्या फायद्यासाठीच?
loksatta kutuhal facial recognition with artificial intelligence
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवणे १
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती