– दररोज एका भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवून इतर भागात पुरेसे पाणी देण्याचा नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुंबई तसेच ठाणे महापालिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा नदीवरील पिसे येथील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी करण्यात आल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात झाली आहे. या दुरुस्ती कामामुळे येत्या २० ऑक्टोबरपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे. पाणी कपातीमुळे सर्वच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी होत नसून यामुळे त्यावर तोडगा म्हणून पालिका प्रशासनाने आता दररोज एका भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवून इतर भागात पुरेसे पाणी देण्याचा नियोजन आखण्यास सुरुवात केले आहे.

हेही वाचा >>> कल्याण मध्ये फूटबाॅल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना टोळक्याकडून बेदम मारहाण

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. हा स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचा मानला जातो. या पाण्याचा पुरवठा दिवा वगळता संपुर्ण महापालिका क्षेत्रात करण्यात येतो. या योजनेसाठी भातसा धरणाच्या पिसे बंधारा येथून पाणी उचलण्यात येते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकाही भातसा धरणाच्या पिसे बंधारामधून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम ११ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

या दुरुस्ती कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्याला बसला आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आल्याने ठाणे महापालिकेला बंधाऱ्यातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नसून यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात दहा टक्क्यांनी कपात झाली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. तोपर्यंत ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात कायम राहणार आहे. परिणामी ठाणे शहरातील गावदेवी, कोपरी, टेकडी बंगला, किसननगर, हाजुरी व इंदिरानगर या भागात कमी पाणी पुरवठा होणार असून या भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

दिवाळीच्या तोंडावर पाणी टंचाई

पुढील आठवड्यापासून दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या सणाच्या आधी नागरिकांकडून घरात साफसफाईचे काम करण्यात येते. परंतु पाणी कपातीमुळे दिवा वगळता महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. परिणामी, काही उंच भागांमध्ये पाणी जात नसल्यामुळे तिथे पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्याचबरोबर कमी दाबामुळे इतर भागांनाही पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे साफसफाईची कामे नागरिकांना करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

पाण्याचे नवे नियोजन

पाणी कपातीमुळे दिवा वगळता महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेचे दुरुस्ती काम होईपर्यंत म्हणजेच २० ऑक्टोबरपर्यंत शहरातील एका भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवायचा आणि उर्वरित भागाचा पाणी पुरवठा करायचा, असे नियोजन आखण्याचे काम सुरु आहे. या नियोजनामुळे नागरिकांना एकच दिवस पाणी मिळणार नाही. पण, उर्वरित दिवशी मात्र पुरेसे पाणी मिळू शकले, या उद्देशातून हे नियोजन आखले जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.