ठाणे : नितीन कंपनी उड्डाणपूलावर शनिवारी दुपारी वाहन बंद पडल्याने तसेच वाहनांचा भार वाढल्याने नितीन कंपनी ते कोपरी पूलापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे मुंबईहून घोडबंदर, माजिवडा, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे हाल झाले.
नितीन कंपनी उड्डाणपूल येथून शनिवारी दुपारी सिमेंट मिक्सर वाहन घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करत होता. हे वाहन अचानक बंद पडले. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोपा निमित्ताने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आले होते. तसेच वाहनांचा भारही शहरात अधिक होता. त्यामुळे नितीन कंपनी ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती.