ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी तुळई (गर्डर) उभारले जात आहे. यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री प्रवेशबंदी लागू केली आहे. येथील वाहने कापूरबावडी येथून भिवंडी मार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने वाहतुक करू शकतील. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण येथील जेएनपीटी बंदर, भिवंडी येथून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई, विरार आणि गुजरातमधील गोदामाच्या दिशेने वाहतुक करत असतात. ठाणे शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच पर्यंत प्रवेश आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या वेळेत घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक होत असते. घोडबंदर मार्गावर गेल्याकाही वर्षांपासून मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गावर ‘यु’ आकाराची तुळई उभारण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केले आहे. या कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर मध्यरात्री बंदीचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. या वाहतुक बदलामुळे मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी असेल. हे वाहतुक बदल दररोज रात्री १२ ते पहाटे पाच यावेळेत २८ नोव्हेंबरपर्यंत दररोज लागू असतील.

हेही वाचा : मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक

वाहतुक बदल

  • मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी चौक येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने माजिवडा येथून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
  • मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने गॅमन मार्गे, खारेगाव खाडी, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
  • नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंदी आहे. येथील वाहने मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane traffic police imposed midnight entry ban for heavy vehicles on ghodbunder route till 28th november css