ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विरुद्ध दिशेने होणारी वाहतुक रोखण्यासाठी ठाणे वाहतुक पोलीस आणि ठाणे महापालिकेने टायर किलर बसविले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे टायर किलर बसविण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवरही टायर किलर बसविले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुक सुरळीत राहावी यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका केल्या आहेत. असे असले तरी या मार्गिकांवर वाहतुक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषत: रिक्षा चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे वाहतुक अडथळा होऊन कोंडी होत असते. विरुद्ध दिशेने वाहने चालविल्यास गंभीर अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलीस आणि ठाणे महापालिकेने या मार्गांवर टायर किलर बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात ठाणे रेल्वे स्थानक येथून मो.ह. विद्यालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर टायर किलर बसविण्यात आले आहे. हे टायर किलर प्रायोगिक तत्तवावर बसविण्यात आले आहे. टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader