हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे
आपल्या अवतीभोवती असणारे गुणवंत विद्यार्थी केवळ आर्थिक कारणांनी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून कल्याणमधील बोरगांवकर वाडय़ात राहणाऱ्या काही संवेदनशील तरुणांनी आठ वर्षांपूर्वी ‘स्पंदन’ ही संस्था स्थापन करून यथाशक्ती मदत सुरू केली. या उपक्रमासाठी निधी संकलनाच्या हेतूने वर्षभरात दोन दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम संस्था आयोजित करते. येत्या शनिवारी २५ जून रोजी अत्रे नाटय़गृहात रात्री ८.३० वाजता या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेतील ‘पलपल दिल के पास’ ही सदाबहार हृदयस्पर्शी हिंदी-मराठी गाण्यांची मैफल स्पंदनतर्फे सादर केली जाणार आहे. मुग्धा वैशंपायन, संगीता चितळे, श्रीरंग भावे, डॉ. शिल्पा मालंडकर आणि निनाद आजगांवकर हे गायक कलावंत या मैफलीत गाणी सादर करणार आहेत. स्वरनिनाद प्रस्तुत या मैफलीचे सूत्रसंचालन मंदार खराडे आणि रश्मी आमडेकर करणार आहेत.
- कधी: शनिवार, २५ जून,
- केव्हा : रात्री-८.३० वाजता
- कुठे :आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण</li>
पुन्हा एकदा ‘अर्धसत्य’
बहुतेक हिंदी सिनेमे स्वप्नरंजन करणारे असतात. मात्र आपण जे पाहतोय, ते कधी प्रत्यक्षात घडणारच नाही, याची खात्री असूनही प्रेक्षक रुपेरी पडद्यावरील दोन-अडीच तासांचा खेळ पाहत असतात. मात्र काही सिनेमे थेट वास्तवाला भिडणारे, आपल्या अवतीभोवतीचे जगणे जसेच्या तसे मांडणारे असतात. त्यात स्वप्नाऐवजी ढळढळीत सत्य मांडलेले असते. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अर्धसत्य’ हा या वास्तववादी लाटेतील प्रमुख सिनेमा. सुप्रसिद्ध मराठी कथाकर श्री.दा.पानवलकर यांच्या ‘सूर्या’ या कथेवर आधारित या सिनेमाची पटकथा ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी लिहिली आहे. गोविंद निहलानी दिग्दर्शित या सिनेमात पुढील काळात आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमासृष्टी गाजविणारे ओमपुरी, स्मिता पाटील, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शहा, शफी इनामदार आणि सदाशिव अमरापूरकर हे मातब्बर कलावंत आहेत. ज्येष्ठ कवी दिलीप चित्रे यांच्या कविता हेही चित्रपटाचे एक आकर्षण आहे. या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमात भ्रष्ट नेते आणि त्यांनी पाळलेल्या गुंडांमुळे पोलिसांची होणारी कुचंबणा अतिशय परिणामकारकपणे मांडण्यात आली आहे. येत्या शनिवारी ऐरोलीत महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने संध्याकाळी हा चित्रपट दाखविला जाणार आहे. चित्रपटानंतर प्रभात चित्र मंडळाच्या सदस्यांसोबत चित्रपटावरील चर्चेत सहभागी होण्याची संधीही रसिकांना मिळेल. प्रवेश विनामूल्य आहे.
- कधी : शनिवार, २५ जून,
- केव्हा : संध्याकाळी-६.३० वाजता
- कुठे: महाराष्ट्र सेवा संघ ऐरोली शाखा, म.बा.देवधर संकुल, सेक्टर १७, ऐरोली, नवी मुंबई.
निसर्ग सान्निध्यात भटकंती
निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना मन प्रसन्न होते. प्रदूषणामुळे घुसमटलेल्या तनामनाला झाडांच्या सोबतीने मोकळा श्वास घेता येतो. त्यामुळेच जरा उसंत मिळाली की शहरातील पर्यावरणप्रेमी जंगल परिसरात भटकंती करायला जातात. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच या संस्थेने येत्या रविवारी ठाणे आणि डोंबिवली परिसरात निसर्गभ्रमंती आयोजित केली आहे. पर्यावरणातील विविध परिसंस्थांचे दर्शन या निसर्ग भटकंतीमधून निसर्गप्रेमींना होणार आहे. ठाण्यातील ससुपाडा, नागला बंदर, घोडबंदर रोड येथे निसर्ग भटकंतीचे आयोजन करण्यात आले आहे. रानफुले, अनेक कीटक, पावसाळी पक्षी अशा अनेक गोष्टींचे दर्शन या भटकंतीमध्ये होणार आहे तर डोंबिवली येथील नाना-नानी उद्यान, गावदेवी मंदिराजवळ, मानपाडा रोड डोंबिवली पूर्व येथे निसर्ग भटकंतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-२२-२५३८०६४८.
- कधी : रविवार, २६ जून ’ कुठे : डोंबिवली, ठाणे
तरुणाई संगीत महोत्सव
नवोदित कलावंतांचे हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ अशी ख्याती असलेला तरुणाई संगीत महोत्सव येत्या बुधवारी, २९ जून रोजी गडकरी रंगायतनमध्ये रात्री ८.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. गणेश कल्चरल अॅकॅडमीतर्फे होणाऱ्या या महोत्सवात ४० नवोदित कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
‘नादवर्षां’ या सत्रात पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्यांचे तबलावादन, ‘सुगम वर्षां’ सत्रात उपशास्त्रीय गायन आणि ‘नृत्यवर्षां’ या सदरात मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्यांचा कथ्थक नृत्याविष्कार सादर होणार आहे. ठाणेकर रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून युवा कलावंतांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन अॅकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
- कधी: बुधवारी, २९ जून
- केव्हा : रात्री-८.३० वाजता
- कुठे :गडकरी रंगायतन
शास्त्रीय मैफलींची मेजवानी
भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानभास्कर पं. माधव गुडी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात तीन दिवसीय शास्त्रीय मैफलींचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी, २४ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता समीप कुलकर्णी यांचे सतारवादन आणि पं. मुकुंदराव देव यांचे तबला वादन होईल. त्यानंतर डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे नाटय़संगीत मैफल सादर करतील. दुसऱ्या दिवशी शनिवारी २५ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पं. रतीश ताडगे यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यानंतर विदुषी अर्चना कान्हेरे आणि पं. कैवल्यकुमार यांचे शास्त्रीय गायन होईल. रविवारी २६ जून रोजी सकाळी ९ वाजता सुरुवातीला डॉ. अनुपमा गुडी मंगळवडे यांचे शास्त्रीय गायन त्यानंतर पं. आदित्य कल्याणपूरकर यांचे तबलावादन तर बेगम परबीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन होईल.
- कधी : शुक्रवार २४ ते रविवार २६ जून.
- केव्हा : पहिले दोन दिवस-संध्याकाळी ५.३०, रविवारी सकाळी ९
- कुठे: सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प).
हास्य एकांकिकांचे सादरीकरण
माणसाच्या आयुष्यात हसणे खूप महत्त्वाचे आहे. हसण्याने आरोग्यही चांगले राहते, असा निर्वाळा आता अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीही दिला आहे. मात्र धकाधकीच्या जीवनात माणूस हसणे विसरत चालला आहे. येत्या सोमवारी मोरया इव्हेंट्स अॅन्ड
एंटरटेनमेंट तसेच इम्प्रोव्हायझेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतनमध्ये ‘बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’ आणि ‘हाऊसगुल’ या हास्य एकांकिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. दोन्ही एकांकिका लेखक विशाल कदम लिखित आणि विनोद जाधव दिग्दर्शित असून पोटभर हसण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.
- कधी : सोमवार, २७ जून,
- केव्हा : वेळ- ४.३० वाजता
- कुठे : गडकरी रंगायतन ,ठाणे
गोड पदार्थाची मेजवानी
गोड खाद्यपदार्थ चाखण्याची आवड असणाऱ्या खवय्यांना तिखट जेवणानंतर एखादा तरी गोड पदार्थ हवा असतो. नेहमीचे श्रीखंड आणि खीर खाऊन कंटाळलेल्या खवय्यांना गोड पदार्थामध्येदेखील नावीन्य हवे असते. गोड पदार्थाच्या विविध पाककृती शोधण्यासाठी पाककलेची पुस्तके, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांमध्ये शोधाशोध सुरू होते. यंदा कोरम मॉलच्या वर्कशॉपला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महिलांसाठी गोड पदार्थाच्या पाककृती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण असे परदेशी गोडाची मेजवानीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- कधी : बुधवार, २९ जून
- केव्हा : दुपारी ३ ते ८
- कुठे : कोरम मॉल, ठाणे
साहित्यिकांचा त्रिवार जयजयकार
अलीकडच्या काळात नवनवीन कवींची गाणी गुणगुणायला तरुणांना भावत असले तरी जुन्या साहित्यिकांच्या विश्वात रमणारी तरुण पिढी अनोखी होती. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचा वाचनांद घेणारे रसिक वाचक आजही प्रभावीपणे तरुणांना या साहित्यिकांच्या लिखाणाची ताकद समजावतात. सर्वच वयोगटातील रसिक वाचकांवर या साहित्यिकांनी आपल्या लिखाणाने भुरळ पाडली. मित्रमैत्रिणींच्या कट्टय़ावर या साहित्यिकांच्या कविता, लेखांची चर्चा रंगायची. काळ लोटला तरी या अभिजात साहित्यिकांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ज्ञानपीठ विजेत्या श्रेष्ठ मराठी साहित्यिकांना संगीत, नाटय़ आणि काव्यरूपी मानवंदना देण्यासाठी स्वरार्चना निर्मित त्रिवार जयजयकार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अर्चना दिनेश, अमेय फडके, मानसी फडके, विलास गुर्जर हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
- कधी : शनिवार, २५ जून
- केव्हा :- सायंकाळी ६.३० वाजता
- कुठे : साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई
कल्याणमध्ये बालनाटय़
मराठी माणूस नाटकवेडा असल्याचे बोलले जाते. लहान मुलेही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळेच येथील बालरंगभूमीवर खास छोटय़ा दोस्तांसाठी सातत्याने बालनाटय़े सादर होत असतात. अरुणोदय प्रतिष्ठानच्या वतीने येत्या बुधवारी ३० जून रोजी रात्री ८.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प) येथे ‘आला रे आला’ या बालनाटय़ाचा प्रयोग होणार आहे.
- कधी : बुधवार, ३० जून
- केव्हा: रात्री ८.३० वाजता
- कुठे : आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प)