ठाणे : येथील यशोधन नगर परिसरात असलेल्या एका आयुर्वेदिक दवाखान्यात दोन व्यक्ती पोलिसांच्या वेषामध्ये येऊन डॉक्टरांकडे वर्गणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर डॉक्टर घडलेला प्रकार पोलिसांना सांगण्यासाठी वर्तक नगर पोलीस ठाण्यात संपर्क करत होते, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दीड तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु, या संदर्भात अद्याप कोणतिही तक्रार दाखल करण्यात आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील यशोधन नगर भागात एक आयुर्वेदिक दवाखाना आहे. ज्या इमारतीत हा दवाखाना आहे, त्या इमारतीत सुरक्षारक्षक किंवा सिसिटीव्ही कॅमेरे नाही. या दवाखान्यात उपचाराठी येणाऱ्या रुग्णांची दिवसभर गर्दी असते. मंगळवारी दुपारी दवाखान्यात अचानक दोन व्यक्ती पोलिसांच्या वेषात आले. यावेळी बाहेर असलेल्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना वाटले की हे खरेच पोलीस आहेत. म्हणून कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना बाहेर बोलावून घेतले.

डॉक्टरांनी त्यांना विचारलं काय काम आहे तुमचं, इथे का आला आहात तुम्ही? तेव्हा ते दोन्ही व्यक्ती म्हणाले, “चंदा मागणे आये थे” आणि डॉक्टरांनी अधिक विचारपूस केली असता, त्या दोन्ही व्यक्तींनी तिथून पळ काढला. त्यावेळी डॉक्टरांना या दोन्ही व्यक्तींबाबत संशय निर्माण झाला आणि या व्यक्तींमुळे कोणताही धोका निर्माण व्हायला नको म्हणून त्यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात संपर्क केला. परंतु, सुरुवातीला पोलिसांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, दीड तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane yashodhan nagar two men disguised policeman demanded money from ayurvedic doctor sud 02