‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ चे सहावे पर्व

खरेदीवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि दरवर्षी ठाणेकरांच्या उदंड प्रतिसादात साजऱ्या होणाऱ्या रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ चे सहावे पर्व शुक्रवारपासून सुरू होत आहे. या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबईतील अनेक दुकानांनी भाग घेतला आहे.

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांतून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. यंदा महोत्सवाच्या आयोजनात ठाणे महापालिकेचेही सहकार्य लाभणार आहे. विविध कार्यक्रमांची पर्वणी ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरसारख्या आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहेत. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात १७ फेब्रुवारीपर्यंत सहभागी होता येणार आहे. या खरेदी उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या  भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी आणि लिनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. शुभकन्या, गडकरी कट्टा, दीपक टूर्स हे प्लॅटिनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अ‍ॅण्ड सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१, गोविंद भोसले- ९८१९८१४२५३, अतुल जोशी- ९८२१४७५९१९ (नवी मुंबई) यांच्याशी संपर्क साधावा.

भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी आणि लिनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. शुभकन्या, गडकरी कट्टा, दीपक टूर्स हे प्लॅटिनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अ‍ॅण्ड सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१, गोविंद भोसले- ९८१९८१४२५३, अतुल जोशी- ९८२१४७५९१९ (नवी मुंबई) यांच्याशी संपर्क साधावा.

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसे जिंकण्याची संधी मिळू शकेल.

*  सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुकानदारांकडून एक कूपन दिले जाईल.

*  ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकावे.

*  अर्धवट माहिती भरलेली कूपन स्वीकारली जाणार नाहीत.

*  ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांची नावे ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’ मधून प्रसिद्ध केली जातील.

*  या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

Story img Loader