करोना संसर्ग कमी झाल्यामुळे सण आणि उत्सवांवरील निर्बंध राज्य सरकारने हटविल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याबरोबरच ठाणेकरांनी पर्यावरणपुरक विसर्जनाची परंपरा कायम राखल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरातील तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेकडून यंदाही गणेश मुर्ती विसर्जनाकरिता पर्यावरणपुरक कृत्रिम तलावांची विविध भागात निर्मिती केली असून या तलावांमध्ये दिड, पाच आणि सहा दिवसांच्या एकूण १७ हजार ९०६ गणेश मुर्तींचे तर १ हजार ३ गौरींचे विसर्जन करण्यात आले.

या निमित्ताने महापालिकेने गणेश मुर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या पर्यावरणपुरक कृत्रिम तलाव संकल्पनेस ठाणेकरांकडून यंदाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठाणे शहराला तलवांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे शहरात एकेकाळी ७५ च्या आसपास तलाव होते. भुमाफियांनी अनेक तलाव बुजवून त्यावर अतिक्रमण केले. शहरात आता ३५ तलाव शिल्लक राहिले आहेत. या तलावांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचबरोबर तलावांचे पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेकडून गणेश मुर्ती विसर्जनासाठी तलावांच्या शेजारीच कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येते. या व्यवस्थेमुळे शहरातील तलावांचे प्रदुषण रोखले जात आहे. पालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या या संकल्पनेस ठाणेकरांचाही प्रतिसाद मिळत आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?

हेही वाचा : डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत भुरट्या चोऱ्या वाढल्याने रहिवासी हैराण

गेल्या काही वर्षात कृत्रिम तलावांमध्ये मुर्ती विसर्जन करण्यासाठी ठाणेकरांचा ओघ वाढताना दिसून येत आहे. यंदाही ठाणे महापालिकेने अशाचप्रकारचे कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच या तलावांमध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन पालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी केले होते. त्यास ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : डोंबिवली : खंबाळपाडा भोईरवाडीतील रस्त्यासाठी २०१४ मध्ये चार कोटी मंजूर ; रहिवाशांचा अजूनही खड्ड्यातून प्रवास

कृत्रिम तलावांमध्ये दिड दिवसांच्या ८ हजार ४८, पाच दिवसांच्या २ हजार २५८ आणि सहा दिवसांच्या ७ हजार ६०० गणेश मुर्तींचे तर १ हजार ३ गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. अशाचप्रकारे दिड, पाच आणि सहा दिवसांच्या एकूण १७ हजार ९०६ गणेश मुर्तींचे तर १ हजार ३ गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला ठाणेकरांकडून यंदाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच यंदाही ठाणेकरांचा कृत्रिम तलावांमध्ये मुर्ती विसर्जन करण्यासाठी ओघ कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गणेश मुर्ती विसर्जन आकडेवारी

कृत्रिम तलाव दिड दिवस पाच दिवस सहा दिवस गौरी
दत्तमंदीर घाट – 1368 173 1110 87
अहिल्यादेवी घाट – 630 46 760 61
खारेगाव तलाव – 560 177 513 37
आंबेघोसाळे तलाव – 490 102 333 55
रायलादेवी घाट – 410 158 823 116
रायलादेवी घाट – 1072 431 1038 130
रेवाळे तलाव – 610 91 423 13
खिडकाळी तलाव – 141 87 106 7
शंकर मंदीर तलाव – 69 6 211 20
निळकंठ वुडस – 831 320 393 18
उपवन – 1867 667 1480 69
एकूण – 8048 2258 7600 1003