लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पंधरावड्यात जेमतेम दोन ते तीन कोटींचा मालमत्ता कर जमा होतो. यंदा मात्र महापालिकेच्या तिजोरीत या करापोटी तब्बल २८ कोटी ४२ लाखांचा महसुल जमा झाला आहे. यातील ९० टक्के कराचा भारणा ऑनलाईनद्वारे झाल्याने ठाणेकरांनी पालिकेच्या ऑनलाईन करभारणा सुविधेला पसंती दिल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नवे आर्थिक वर्ष सुरु होताच महापालिका मालमत्ता कराची देयके तयार करून त्याचे एप्रिल आणि मे महिन्यात घरोघरी वितरण करते. परंतु यंदा ठाणेकरांना एप्रिल महिन्यातच कराचा भारणा करण्यासाठी मोबाईल संदेशद्वारे पाठविण्यात आले असून त्यामध्ये ऑनलाईन कराचा भारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळेच कराच्या रक्कमेत वाढ झाल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

stationary survey team found Five and half crore worth of jewellery in Kolhapur
कोल्हापुरात स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले साडेपाच कोटींचे दागिने
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
SAR Televenture takes over Tikona for Rs 669 crores print eco news
‘एसएआर टेलीव्हेंचर’चा ६६९ कोटींच्या मोबदल्यात ‘तिकोना’वर ताबा
Narayana Murthy Success Story
Success Story : एकेकाळी नोकरीसाठी मिळाला नकार; जिद्दीने उभी केली स्वतःची कंपनी अन् उभारला हजारो कोटींचा व्यवसाय
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
local express train got disrupted due to traffic jam at diva railway crossing gate
दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत

ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने पालिका आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. हि परिस्थिती आजही कायम आहे. विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर परिणाम झाला असला तरी महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणी देयकांची अपेक्षित कर वसुली होताना दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता करापोटी ७१३ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. या कराच्या उत्पन्नात मात्र वाढ झाली असून गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे.

आणखी वाचा- ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ‘पैसे भराआणि वाहने उभी करा’ योजनेला प्रारंभ

महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ७६१ कोटी ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मालमत्ता करापोटी अपेक्षित धरले असून हे उद्दीष्ट पार करण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने यंदाठाणेकरांना एप्रिल महिन्यातच कराचा भारणा करण्यासाठी मोबाईल संदेशद्वारे पाठविण्यात आले आहेत त्यामध्ये ऑनलाईन कराचा भारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यास ठाणेकरांकडून प्रतिसाद देऊन कराचा भारणा करण्यास सुरूवात झाली आहे. यामुळेच नव्या वर्षाच्या पहिल्याच पंधरावड्यात तब्बल २८ कोटी ४२ लाखांचा महसुल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यातील ९० टक्के कराचा भारणा ऑनलाईनद्वारे झाल्याने ठाणेकरांनी पालिकेच्या ऑनलाईन करभारणा सुविधेला पसंती दिल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

ठाणे महापालिकेचे मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये मालमत्ता कर भारणा केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. याठिकाणी नागरिकांना रांगेत उभे राहून कराचा भारणा करावा लागतो. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून पालिकेने नागरिकांना ऑनलाईनद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप या प्रणालीद्वारेही कर भारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला पसंती देऊन नागरिक कराचा भारणा करताना दिसून येत आहेत.

कर वसुली आकडेवारी

प्रभाग समिती- कराची वसुली
उथळसर- २.४१ कोटी
नौपाडा- कोपरी ३.५५ कोटी
कळवा- ८६ लाख
मुंब्रा- ५७ लाख
दिवा- ९५ लाख
वागळे- ७९ लाख
लोकमान्य सावरकर- १.१५ कोटी
वर्तकनगर- ४.०६ कोटी
माजिवाडा-मानपाडा- १२.०१ कोटी
व इतर- २.०६
एकूण- २८.४२ कोटी