भाईंदर : मीरा रोड येथील शहीद उद्यानात महापालिकेने उभारलेली ‘अमर ज्योत’ अवघ्या नऊ महिन्यांत विझली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेच्या गलथान कामकाजावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मीरा रोड येथे राहणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे हे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ७ ऑगस्ट २०१८ रोजी शहीद झाले. त्यामुळे राणे यांच्या कर्तुत्वाची स्मृती शहरात कायम जपली जावी यासाठी ‘शहीद स्मारक’ उभारण्याची संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. त्यानुसार रामदेव पार्क येथील आरक्षण क्रमांक २६९ मधील उद्यानात या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. याच शिवाय या शहीद स्मारकाच्या मधोमध ‘अमीर ज्योत’ उभारण्यात आली.
हेही वाचा – कल्याणफाटा भागात आजपासून प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल
या कामाचे लोकार्पण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा आणि कौस्तुभ राणे यांच्या पालकांनी प्रमुख उपस्थितीती दर्शवली होती. मात्र लोकार्पनाच्या आता नऊ महिन्यांनंतर ही अमर ज्योत विजली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून यावर संताप व्यक्त केला जात आहे. तर यात काही इलेक्ट्रिकल अडचण आली की नाही?याची माहिती घेतली जात आहे. मात्र आता ती ज्योत तेवत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यतीन जाधव यांनी दिली आहे.