डोंंबिवली: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचरा वाहनावरील एका वाहन चालकावर गेल्या आठवड्यात पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर हल्ला झाला होता. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यातील चार हल्लेखोरांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व हल्लेखोर घाटकोपर भागातील रहिवासी आहेत. बेकायदा बांधकामांतील व्यवहारातून हा हल्ला झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाच्या मुळाशी बेकायदा बांधकामे, त्यामधील बिघडलेले व्यवहार यांचा काही समावेश आहे का, या मार्गाने तपास करत आहेत. कमरूद्दीन शेख, अरबाज सय्यद, मोहम्मद शेख, शाहरूख शेख अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी २२ ते ३० वयोगटातील आहेत.

हेही वाचा.. कल्याण डोंबिवली पालिकेच्या कामगारावर जीवघेणा हल्ला

विनोद मनोहर लकेश्री हे कल्याण डोंबिवली पालिकेतील आरोग्य विभागाच्या कचरा वाहू वाहनावर टिटवाळा अ प्रभागात कार्यरत आहेत. मागील काही वर्षात लकेश्री यांचे नाव डोंबिवलीतील २७ गाव, नांदिवली, देसलेपाडा भागातील आणि इतर बांधकामांशी जोडले गेले आहे. आपले पालिकेतील वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, असे लकेश्री नेहमी भूमाफियांना सांगत. या माध्यमातून ते माफियांशी जवळीक साधत होते, अशा तक्रारी आहेत. अशा व्यवहारात त्यांचे काही भूमाफियांशी वितुष्ट आले होते, अशी पालिकेत चर्चा आहे. त्यातून हा प्रकार घडला आहे का, या बाजुने पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा… भांडणाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण

पोलिसांनी हल्लोखोरांचा तपास सुरू केला आहे. या तपासातून बेकायदा व्यवहाराशी संबंधित माहिती बाहेर येते का याची चौकशी पोलीस करत आहेत. पालिकेतील एका उपायुक्ताने वाहन चालक लकेश्री नियमित कार्यालयात येतात का याची चौकशी करण्याचे आणि तसा अहवाल वरिष्ठांना दाखल करण्याचे आदेश दिले होते. ते नियमित कामावर येत होते, असे अ प्रभागातील आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The attackers of the muncipal garbage truck driver arrested in dombivli dvr
Show comments