कळवा खाडीत बुडालेला सात वर्षीय मुलाचा मृतदेह अखेर सोमवारी ऐरोली खाडीत आढळला आहे. रिशी उस्वा सुमारे आठवड्याभरापूर्वी सायकल चालवताना खाडीत पडला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रीशी उस्वा हा खाडी शेजारी असलेल्या नागसेन नगर परिसरात त्याच्या कुटूंबासह राहत होता. मागील आठवड्यात बुधवारी सायंकाळी घराबाहेर तो सायकल चालवत होता. त्यावेळी तोल जाऊन तो खाडीत पडला. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवानांकडून त्याचे शोधकार्य सुरु होते. परंतू, त्याचा शोध लागत नव्हता.

अखेर सोमवारी विटावा ते ऐरोली खाडीच्या दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The body of the boy who drowned in kalwa bay was finally found amy