ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेत रुग्णालयातील वाॅर्डबाॅय जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कळवा येथे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. रविवारी मध्यरात्री रुग्णालयातील तळमजल्यावरील एका कक्षात छताचे प्लास्टर कोसळले. कक्षामध्ये वाॅर्डबाॅय उपस्थित होता. त्याच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.