डोंबिवली पूर्व भागात सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा, नांदिवली, एमआयडीसी भागात काँक्रीटीकरणाची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संथगती कामांमुळे दररोज वाहन कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. या कोंडीमुळे वळसा घालून प्रवास करावा लागत असल्यानेे रिक्षा चालकांनी मनमानी करुन आठ रुपये भाडेवाढ केली आहे.या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. दररोज मानपाडा रस्ता, नांदिवली रस्त्यावरील वाहन कोंडीत अडकावे लागत असल्याने डोंबिवली पूर्वेतील भोपर लोढा हेरिटेज, नवनित नगर गृहप्रकल्प भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी मनमानी पध्दतीने प्रवासी भाड्यात दोन दिवसांपासून आठ रुपये वाढ केली आहे. यापूर्वी या भागात डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून येण्यासाठी २२ ते २३ रुपये आकारले जात होते. अचानक रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून आठ रुपये वाढीव मागण्यास सुरूवात केल्याने या भागातील प्रवासी, रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झाले आहेत.

संथगती काम

गेल्या वर्षापासून मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने त्याचा फटका प्रवाशांना वाहन कोंडीच्या माध्यमातून बसत आहे. रस्त्याच्या एका बाजुने काँक्रीट कामासाठी खोदाई आणि दुसऱ्या बाजुने वाहतूक. अशा दुहेरी कोंडीतून वाहन चालकांना वाहने चालवावी लागतात. या रस्ते कामांवर कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. एमएमआरडीएचे अधिकारी, ठेकेदार कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने या संथगती कामाच्या तक्रारी कोणाकडे करायच्या अशा संभ्रमात नागरिक आहेत.

Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक

हेही वाचा >>>डोंबिवलीत प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पतीचा खून; मृतदेह कसारा घाटात फेकला

जमीनदारांचे अडथळे

नांदिवली पंचानंद स्वामी समर्थ मठ भागातील काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या कामात काही ठिकाणी भरपाई मिळविण्यासाठी भूमाफियांनी अडथळे निर्माण केले आहेत. नांदिवली टेकडीचा उतार कमी करण्यासाठी एका भूमाफियाने अडथळा उभा केला आहे. या अडथळ्यांमुळे ठेकेदाराला काम करण्यात अडथळे येत आहेत. एका लोकप्रतिनिधीच्या संपर्कातील रस्ते ठेकेदार असल्याने ते मनमानीने कामे करत आहेत, असे एका जाणकाराने सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर भागात रिक्षा उलटून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

रिक्षा चालकांची भाडेवाढ

भोपर लोढा हेरिटेज, नवनीतनगर भागात जाण्यासाठी काँक्रीट रस्ते कामांचे अडथळे पार करून जावे लागतात. हे अडथळे पार करताना वाहन कोंडीचा फटका रिक्षा चालकांना बसतो. अर्धा ते एक तास कोंडीत अडकून पडावे लागते. काही वेळा वळसा घेऊन प्रवासी वाहतूक करावी लागते. या वळण रस्त्यांमुळे किलोमीटरचा फेरा वाढत असल्याने लोढा हेरिटेज, नवनित नगर भागात जाणाऱ्या रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून वाढीव आठ रुपये उकळण्यास सुरूवात केली आहे, अशा तक्रारी लोढा हेरिटेज भागातील प्रवाशांनी केल्या.‘वळण रस्ता वाढला तरी कोणालाही मनमानीने भाडे वाढविण्याचा अधिकार नाही. अशाप्रकारे कोणी रिक्षा चालक वाढीव भाडे आकारत असेल तर प्रवाशांनी तक्रारी केल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाईल,’ असे ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्याने सांगितले.