डोंबिवली पूर्व भागात सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा, नांदिवली, एमआयडीसी भागात काँक्रीटीकरणाची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संथगती कामांमुळे दररोज वाहन कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. या कोंडीमुळे वळसा घालून प्रवास करावा लागत असल्यानेे रिक्षा चालकांनी मनमानी करुन आठ रुपये भाडेवाढ केली आहे.या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. दररोज मानपाडा रस्ता, नांदिवली रस्त्यावरील वाहन कोंडीत अडकावे लागत असल्याने डोंबिवली पूर्वेतील भोपर लोढा हेरिटेज, नवनित नगर गृहप्रकल्प भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी मनमानी पध्दतीने प्रवासी भाड्यात दोन दिवसांपासून आठ रुपये वाढ केली आहे. यापूर्वी या भागात डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून येण्यासाठी २२ ते २३ रुपये आकारले जात होते. अचानक रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून आठ रुपये वाढीव मागण्यास सुरूवात केल्याने या भागातील प्रवासी, रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झाले आहेत.
डोंबिवलीत रस्त्यांच्या संथगती कामांमुळे रिक्षा चालकांची मनमानी, रेल्वे स्थानक ते लोढा हेरिटेज आठ रुपये भाडेवाढ
डोंबिवली पूर्व भागात सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा, नांदिवली, एमआयडीसी भागात काँक्रीटीकरणाची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2023 at 14:56 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The concreting works are going on at a very slow pace in the busiest area of dombivli east amy