भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नव्याने तयार झालेल्या नाट्यगृहात रविवारी होणारा पहिला नाटक प्रयोग रद्द करण्यात आला आहे. नाट्यगृहाचे काम योग्य नसल्याने आरोप व्यवस्थापकांनी केला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेने ‘भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर हे नाट्यगृह तयार केले आहे या नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण  करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी ३८ कृष्ण वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र नाटकाच्या दोन दिवसापूर्वी नाटक व्यवस्थापकांनी नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहातील ध्वनीक्षेपक यंत्रणातील बिघाड आणि आवश्यक असलेल्या लाईटची सुविधा सुरळीत नसल्याचे आढळले. त्यामुळे नाटक रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी देखील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक यंत्रातील बिघडाची बाब समोर आली होती.

हेही वाचा : जामीन की तुरुंगवास? जितेंद्र आव्हाडांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण, थोड्याच वेळात निकाल

मात्र या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष पणा केल्यामुळे नाट्यगृहातील पहिला व्यावसायिक प्रयोग रद्द करण्याची वेळ आल्याने नाट्यप्रेमी मध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. नाट्यगृहात तांत्रिक बिघाड असल्यामुळे आम्ही नाटक रद्द करत असल्याचे नाटक व्यवस्थापकांनी कळवले आहे. पालिका कोट्यावधी रुपयांच्या वास्तू कोणताही अभ्यास न करिता उभारत आहे. यामुळे नागरिकांचे पैसा वाया जात असल्याची प्रतिक्रिया प्रिया प्रमोद पाटील यांनी दिली.

” नाटक व्यवस्थापकांनी परस्पर नाटक रद्द करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक ते बदल करून येत्या काही दिवसात नाटकाचा हा प्रयोग घेतला जाईल. – रवी पवार, उपायुक्त

“नाट्यगृहाची निर्मिती करत असताना त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने या नाट्य गृहात ते काम झालेले नाही.त्यामुळे आम्ही प्रयोग रद्द करत आहोत.”- गिरीश ओक, अभिनेते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first experiment at meera bhayandar theater was cancelled actor girish oak ravi oak tmb 01