ठाणे : शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वंदना सिनेमागृहाजवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पायथ्याशी काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून या कामामुळे उद्या, शुक्रवारपासून हा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. हे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल, याबाबत काहीच सांगण्यात आलेले नसून हे काम पूर्ण झाल्यानंतरच हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा खुला केला जाणार आहे. या बदलामुळे पुलाखाली असलेल्या अरुंद रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम या मार्गाला जोडणाऱ्या हरिनिवास, खोपट, मखमली तलाव, चरई, तीन पेट्रोल पंप भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा- डोंबिवली : बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँकेतून कर्ज घेण्याचा भूमाफियांचा प्रयत्न

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?

ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुमारे चार वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून शहरातील मिनाताई ठाकरे चौक, वंदना सिनेमागृहासमोरील मार्ग आणि नौपाडा येथे भास्करनगर काॅलनी भागात उड्डाणपूलाची उभारणी केली. या उड्डाणपूलाच्या देखभाल दुरूस्तीची कामे ठाणे महापालिकेकडून केले जात आहेत. मागील काही वर्षांपासून या तिन्ही उड्डाणपूलांच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत आहेत. डांबराच्या साहय्याने खड्डे भरणी केली जात असली तरी ते पुन्हा उखडत आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असतो. या खड्डे प्रवासामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे या तिन्ही उड्डाणपूलांच्या पायथ्याशी काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेऊन मिनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा येथील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी काँक्रीट रस्ता तयार करण्याचे काम सुरु केले होते. यापैकी मिनाताई ठाकरे चौक उड्डाण पुलाचे काम पुर्ण झाले असून येथून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तर, नौपाड्यातील उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा- ठाणे : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ६५ लाख रुपये नुकसान भरपाई

आता वंदना सिनेमागृहाजवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पायथ्याशी काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम पालिकेक़डून शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या मार्गावरून ठाण्यातील खोपट, घोडबंदर, गोकुळनगर भागातून नौपाडा, ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने सतत वाहनांची वाहतूक सुरु असते. तसेच रात्रीच्यावेळेतही नौपाडा, ठाणे स्थानक येथून वाहने याच मार्गावरून खोपटच्या दिशेने वाहतूक करत असतात. तसेच या पुलाखालील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. परिणाम या मार्गाला जोडणाऱ्या खोपट, मखमली तलाव, वंदना सिनेमा, तीन पेट्रोल पंप आणि हरिनिवास चौक या भागातही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- मोबाईल चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले; ठाणे रेल्वे स्थानकातील प्रकार

ठाणे वाहतूक पोलिसांनी हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद करून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे. खोपट सिग्नल येथून तीन पेट्रोल पंपच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना उड्डाणपूलावर प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने उड्डाणपूलाखालील मार्गावरून मखमली तलाव, वंदना सिनेमागृह, तीन पेट्रोल पंपच्या दिशेने वाहतूक करतील. तसेच हरिनिवास येथून खोपटच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना उड्डाणपूलावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वंदना बस थांबा, मखमली तलाव येथून खोपटच्या दिशेने वाहतूक करतील.

तीन पेट्रोल पंप परिसरात मोठ्याप्रमाणात वाहन दुरुस्तीची दुकाने आहेत. या दुकानात दुरुस्तीसाठी येणारी काही वाहने रस्ता अडवून उभी असतात. उड्डाणपूलावरील वाहतूक बंद झाल्यास वाहनांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहनांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा- मोबाईल चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले; ठाणे रेल्वे स्थानकातील प्रकार

काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिका प्रशासनाने मिनाताई ठाकरे चौकातील गोकूळनगर भागात उड्डाणपूलावरील पायथ्याशी असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. परंतु एका ठिकाणी काँक्रीट रस्ता आणि डाँबरी रस्ता पुर्णपणे जोडण्यात आलेला नाही. एक ते दोन फुट अतंरावर डांबर टाकण्यात आलेले नसून यामुळे याठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. त्यात वाहने आदळत आहेत. या भागात अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.