अंबरनाथच्या वडोळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने अंग मस्करी करत उच्चदाब हवेची नलिका थेट सहकारी मित्राच्या पार्श्वभागात घुसवली. त्यामुळे या तरूणाच्या शरीरात अंतर्गत गंभीर दुखापत झाली आहे. या तरुणावर आता शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथच्या वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत पीडित तरुण काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला हा तरुण कामावर आला होता. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा तरुण कंपनीत यंत्रावर काम करत असताना त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला. अंग मस्करी करताना मित्राने उच्चदाब हवेची नलिका या तरुणाच्या पार्श्वभागात घुसवली. यामुळे ही उच्चदाब हवा तरुणाच्या आतड्यांमध्ये जाऊन त्याला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली. त्यानंतर तो क्षणार्धात खाली कोसळला. त्याच्या त्याच मित्राने त्याला उचलून रुग्णालयात दाखल केले. या तरुणाला तपासल्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सुचवले.

प्रकृती सध्या अतिशय नाजूक –

या तरुणाची प्रकृती सध्या अतिशय नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार करायची नसल्याची भूमिका तरुणाने घेतली आहे. मात्र अंगमस्करी जीवावर कशी बेतू शकते याचे उदाहरण या घटनेतून पाहायला मिळाले आहे.