डोंबिवली येथून चार वर्षांपूर्वी १७ वर्षीय मुलगी मित्रासोबत घर सोडून निघून गेली होती. या मुलीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण ओडिशा येथे शोध घेऊन पुन्हा घरी आणले. मुलीला पाहताच तिच्या कुटुंबियांना आनंद झाला होता.उत्तर प्रदेश येथे मुलगी राहत होती. त्याच भागात वास्तव्यास असलेल्या तिची एका तरुणासोबत ओळख झाली होती. तिचे वडील डोंबिवली येथे एकटेच वास्तव्यास असतात. २०१९ मध्ये मुलगी त्यांच्याकडे काही दिवस राहण्यास आली होती. त्यानंतर ती अचानक घरातून गायब झाली. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा समांतर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून सुरू होता. दरम्यान, ती ओडिशामध्ये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण, पोलीस हवालदार सोननिस, पोलीस अंमलदार कदम यांनी ओरिसा येथे जाऊन त्यांचा शोध घेतला. त्यावेळी तिने मित्रासोबत विवाह केल्याचे आढळून आली. या मुलीचे वय आता २१ असून तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.