भगवान मंडलिक
आगामी पालिका निवडणुकीसाठीचे सर्वसाधारण महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासहचे एकूण ४४ प्रभागांमधील आरक्षण शुक्रवारी पालिका निवडणूक आयोगाने सोडत पध्दतीने जाहीर केले. नागरिकांच्या मागास प्रवर्गामुळे निवडणूक लढविण्यात असलेली संदिग्धता आज खऱ्या अर्थाने संपली. बहुसद्स्य प्रभाग पध्दतीमध्ये ओबीसी आरक्षणामुळे आपण आपल्या कुटुंबासह (वडील, आई, मुलगा-मुलगी) निवडून येऊ शकतो याची खात्री प्रस्थापित, बलदंड नगरसेवकांना झाल्याने निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.
आता घराघरात आई, वडील, मुलगा-मुलगी नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहू लागतील. यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांनी यापूर्वीच आम्हाला एक घरात तीन तिकिटे पाहिजेत अन्यथा दुसऱ्या पक्षात जातो याची तयारी यापूर्वीच केली आहे. आता तर शिवसेनेत शिंदे गट, ठाकरे गट असल्याने प्रस्थापित, इच्छुकांना पक्ष नेत्यांसमोर दुसऱ्या पक्षात जाण्याचा बागुलबुवा दाखवून एका घरात एक ते दोन उमेदवारीसाठी तिकिटे मिळविण्याची आयतीच संधी चालून आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून पालिका निवडणूक विभागाने ओबीसी प्रवर्गासाठी ३५ जागांसाठी आरक्षण निश्चित केले. तसेच सर्वसाधारण गटातील ४० महिलांसाठीचे प्रभाग निश्चिती करण्यात आली. पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, निवडणूक उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या उपस्थितीत सचिव संजय जाधव यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली. ओबीसी आरक्षणामुळे आतापर्यंत निवडणुकीत उमेदवारी मिळेल, निवडून येऊ असे गप्पा मारणारे नगरसेवक या प्रक्रियेतून बाद किंवा उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना कमालीचा टेकू लावावा लागणार असल्याचे कळते.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्या रिक्त जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी यापूर्वी पक्ष कार्यकर्ते, होतकरू इच्छुक यांनी केली होती. आता ओबीसी आरक्षणातून निवडणुका होणार असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. गेल्या दोन वर्षापासून बहुतांशी नगरसेवकांनी त्रिसदस्य प्रभाग पध्दतीत स्वता, पत्नी आणि मुलगा किंवा खास कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल अशी व्यूहरचना आखून ठेवली आहे. आता ओबीसी आरक्षणामुळे ही व्यूहरचना खरी ठरण्याची चिन्हे आहेत. आपल्या मागणी प्रमाणे उमेदवारी पक्षाने दिली नाही तर अनेक जण शिंदे, ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादीचा पदर पकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.
तीन सदस्य प्रभाग पध्दती, त्यामधील उमेदवारी निश्चित करताना पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. एका प्रभागात प्रस्थापित नगरसेवकाला उमेदवारी दिल्यानंतर दुसऱ्या प्रभागात आरक्षणाप्रमाणे पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अशावेळी प्रस्थापित नगरसेवक दुसऱ्या, तिसऱ्या प्रभागात आपला मुलगा, मुलगी किंवा पत्नीला उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. याच पक्षातील इतर होतकरू उमेदवार पण त्या प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांची नाराजी दूर करताना पक्ष नेत्यांची दमछाक होणार आहे. उमेदवारी मिळाली नाही तर अनेक जण बंडखोरी करण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा खेळखंडोबा जोरात रंगणार असल्याचे शुक्रवारच्या आरक्षण सोडतीवरुन दिसन येते.
जुन्या जाणकार राजकीय मंडळींनी तिन्ही प्रभागांमधील आरक्षण सोडती जाहीर झाल्याने आता पालिका निवडणुूकीच्या तोंडावर उमेदवारी देताना सर्वच पक्षनेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे असे सांगितले. तर दोन वर्षापासून पालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले कुटुंब मनातून खूष होऊन आता आपले कुटुंबच नगरसेवक होणार म्हणून मनातून गाजरे खात आहेत, असल्याचे शहरात चित्र आहे.
याविषयी उघडपणे कोणत्याही पक्षातील नेता, पदाधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही.
पालिका प्रभाग
एकूण नगरसेवक १३३
एकूण प्रभाग ४४
अ.जाती १३ (महिला ७)
अ.जमाती ४(महिला २)
ओबीसी ३५ (महिला १८)
सर्वसाधारण ८१(महिला ४०)