दिवा : लोकल ट्रेनमध्ये शिरायला मिळाले नाही म्हणून एक महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये शिरल्याचा प्रकार बुधवारी सकाळी दिवा स्थानकात घडला. या घटनेमुळे सकाळी रेल्वेसेवा काही कालावधीसाठी विस्कळित झाली होती.

हेही वाचा – विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकाची चर्चा; डोंबिवलीत क्रांतिदिनानिमित्त राजकीय परिस्थितीचे वाभाडे

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

हेही वाचा – ठाण्यात रस्ते सफाईसाठी गुजरातचे यंत्र वाहन; समाज माध्यमांतून पालिकेवर टीका

संबंधित महिला दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेने कामानिमित्ताने निघाली होती. सकाळी गर्दी असल्याने तिला गाडीमध्ये शिरणे शक्य होत नव्हते. त्याचवेळी सकाळी ६.५२ मिनिटांनी खोपोलीहून मुंबईला निघालेली लोकल ट्रेन दिवा स्थानकात आली. त्यांनतर त्या महिलेने मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मोटरमनने तिला बाहेर पडण्याची विनंती केली. परंतु महिला ऐकत नव्हती. अखेर ७.०५ मिनिटांनी महिलेला केबिनमधून बाहेर काढले. या कालावधीत रेल्वेसेवा विस्कळित झाली होती.