करोनातील टाळेबंदीमुळे रखडलेल्या म्हाडा घरांच्या वाटपामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून या लाभार्थ्यांना शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ करावा अशी मागणी होती. अखेर म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत खोणी आणि शिरढोणच्या लाभार्थ्यांना १० टक्क्यांचा शेवटचा हफ्ता माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे २ हजार लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठीची मागणी केली होती.

हेही वाचा- ठाणे : रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमणांवर हातोडा, उल्हासनगर महापालिकेची कारवाई

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Class 12th boy goes missing from Dombivli Lodha Haven
डोंबिवली लोढा हेवन येथून बारावीचा मुलगा बेपत्ता
11 February 2025 Horoscope In Marathi
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश

कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण तालुक्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारण्यात आली होती. या घरांसाठीची २०१८ साली सोडत काढण्यात आली होती. तर २०२१ पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र करोना टाळेबंदीत हे काम रखडले. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. त्याचवेळी या घरांच्या कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते.

हेही वाचा- ठाणे : कामगार नेते राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्ष कार्यालयात चोरीचा प्रयत्न

एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हफ्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये हे लाभार्थी अडकले होते. त्यातच करोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने लाभार्थ्यांचे हाल सुरू होते. या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्यात यावा अशी मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हाडा प्रशासनाकडे केली होती. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दोन हजार लाभार्थ्यांना याच थेट फायदा होणार आहे. म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोन प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे १ लाख ६३ हजार रुपयांनुसार ३२ कोटी ६२ लाख रुपये वाचले आहेत

Story img Loader