ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे तसेच आसपासच्या परिसरात खड्डे भरणीची कामे सुरु झाली असली तरी या कामांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आनंदनगर परिसरात पेव्हर ब्लॉकचा वापर करून सुरु केलेली खड्डे भरणीची कामे समाधानकारक नसल्याचे निरिक्षण ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नोंदविले. या कामादरम्यान रस्ते आणि खड्डे भरणीची पातळी एकसमान ठेवली जात नाही. त्यामुळे रस्ते उंच-सखल होऊन अपघात होण्याची भिती डॉ. शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या परिसरातच निकृष्ट पद्धतीने खड्डे भरणी सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग तर, घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या मार्गांवर गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावला असून त्यामुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गांचे चौक शहरातील अंतर्गत रस्त्यांना जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे महामार्गांवर होणाऱ्या कोंडीचा परिणाम अंतर्गत रस्त्यांवरही जाणवत आहे. या कोंडीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या कोंडीची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन रस्त्यावरील खड्डे भरणीचे आदेश दिले होते. यानंतर ठाणे तसेच घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गांवरील खड्डे भरणीची कामे संबंधित प्राधिकरणाने हाती घेतली आहेत. पावसामुळे काँक्रीट किंवा डांबरीकरणाद्वारे खड्डे भरणी शक्य नसल्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने खड्डे भरणीची कामे केली जात आहेत. ही कामे करताना रस्ते आणि खड्डे भरणीची पातळी एकसमान ठेवली असून यामुळे रस्ते उंचसखल झाल्याने अपघातांची भिती व्यक्त होत आहे. असे असतानाच ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याच खड्डे भरणीच्या कामांकडे बोट दाखवत ती योग्य प्रकारे होत नसल्याबाबतची नाराजी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोरच व्यक्त केली.

खड्डे भरणी करताना त्यात पेव्हर ब्लाॅक टाकले जातात. अनेकदा रस्त्यांपेक्षा पेव्हर ब्लॉकची उंची जास्त असते. या उंचसखल रस्त्यांमुळे दुचाकींचे अपघात होऊन त्यात जिवीतहानी होऊ शकते. पेव्हर ब्लॉकद्वारे भरलेले खड्डे आणि रस्ते यांची पातळी एकसमान ठेवली जात नाही. सततची वाहतूक आणि पावसामुळे पेव्हर ब्लॉक निघून जातात आणि त्याठिकाणी पुन्हा खड्डा पडतो, असेही आयुक्त शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. खड्डे भरणीनंतर रस्ते उंचसखल होणार नाहीत, याची पुरेपुर काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

कोपरी-वागळेला उद्यापासून मिळणार वाढीव पाणी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपखाडी मतदार संघात ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी सकाळी पाहणी दौरा केला. त्यामध्ये त्यांनी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवर वाढीव पाण्यासाठी करण्यात येत असलेली जोडणी, रस्ते, स्वच्छता तसेच इतर कामांचा आढावा घेतला. मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशानंतर ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने मुंबई महापालिकेच्या जलवाहीनीवरून कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर इतके पाणी देण्यासाठी जलवाहीनी जोडणीची कामे हाती घेतली असून हि कामे पुर्ण होऊन या सर्व भागांना उद्यापासून वाढीव पाणी मिळेल. या भागांना उन्हाळ्यात जी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते, ती समस्या कायमस्वरुपी सुटेल, असा दावा आयुक्त शर्मा यांनी यावेळी केला.