ठाणे – अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्याची प्रक्रिया सुरु असून प्रकरणात विशेष अभियोक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळी याने राहत्या घरात हत्या केली. हत्येनंतर त्याची पत्नी साक्षी घरी आली. विशालने तिला घरात घडलेली घटना सांगितली. विशालने पत्नी साक्षीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. घरात पडलेले रक्त दोघांनी साफ केले.  त्यानंतर त्याने रिक्षा चालक मित्राला संपर्क साधून घरी बोलाविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृतदेह असलेली बॅग रिक्षेत ठेवण्यात आली. पत्रीपूल मार्ग आधारवाडी, गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षा चालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघा दिशेने निघाले. बापगाव भागात अंधार तेथे कोणीही आजुबाजुला नाही. वाहनांची वर्दळ नाही पाहून विशालने मृतदेह बापगाव कबरस्तान भागातील जंगली झुडपे असलेल्या भागात फेकला. तेथून ते तातडीने निघाले. विशालने आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्य खरेदी केले. तेथून तो तात्काळ त्याने आपल्या पत्नीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी रेल्वेने निघून गेला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्याची प्रक्रिया सुरु असून प्रकरणात विशेष अभियोक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषन शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.