कल्याण : कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वरप गावाजवळ एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्या ऑगस्टमध्ये एका बॅगमध्ये एका वयोवृध्दाचा मृतदेह आढळून आला होता. टिटवाळा पोलिसांसह ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने चार महिन्यानंतर या खुनाचा गुन्हा उलगडविण्यात यश मिळवले आहे. हत्या झालेल्या वृध्दाच्या नातेवाईकानेच मर्चंट नेव्ही म्हणून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचे ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीला आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुकेश श्यामसुंदर कुमार (६२) असे हत्या झालेल्या मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचे नाव आहे. ते कल्याणमधील खडकपाडा भागात राहत होते. अजयकुमार रघुनंदन मिश्रा (५४) आणि त्यांचा १७ वर्षाचा मुलगा यांनी ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी अजयकुमार यांना अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलाला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : साहित्यप्रेमींसाठी ” ठाणे ग्रंथोत्सव २०२४ ” चे आयोजन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, चांगदेव काळे यांची उपस्थिती

हे प्रकरण काय होते

वरप गाव हद्दीत एका कचऱ्याच्या ढिगात १५ ऑगस्ट २०२४ मध्ये एक नवीन कोरी बॅग (सुटकेस) आढळली होती. तेथे लघुशंकेसाठी गेलेल्या एका पादचाऱ्याला संशय आला. त्यांनी ती बॅग उघडली त्यात मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात विरुध्द गुन्हा दाखल होता.

गुन्हे शाखेकडून तपास

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कल्याण-मुरबाड मार्गावरील १००हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे या गुन्ह्यासाठी तपासण्यात आले. हवालदार प्रकाश साहील यांना गुप्त माहिती मिळाली की, बॅगेतील मृतदेह एका सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचा आहे. ते कल्याणच्या खडकपाडा भागातील उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. पोलिसांनी संबंधित सोसायटीत जाऊन चौकशी केली. ते ११ ऑगस्टपासून घरी नसल्याचे समजले. मयताचा चुलत भाऊ अजयकुमार मिश्रा वरप गावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

हेही वाचा : नववर्ष स्वागतापूर्वी पोलीस यंत्रणा सतर्क; रेव्ह पार्ट्यांवरही पोलिसांचे लक्ष

नातेवाईकाकडून हत्या

अजयकुमार यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे आली. ११ ऑगस्ट रोजी अजयकुमार यांंनी मुकेश कुमार यांना बहाणा करून वरपच्या घरी बोलविले. त्यांना विष देऊन मारून त्यांची घरातच हत्या केली. त्यांचा मृतदेह बॅगेत भरून तो वरपजवळील कचऱ्याच्या ढीगावर फेकून दिला. मुकेश यांची मुले विदेशात आहेत. त्यांची संपत्ती हडप करण्याच्या इराद्याने हे कृत्य अजयकुमार यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ निरीक्षक मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कदम, आकाश साळुंखे, सुनील कदम, प्रकाश साहील, संतोष सुर्वे, सतीश कोळी, गोविंद कोळी, हेमंत विभुते, स्वप्निल बोडके, रवी राय, दीपक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.