झणझणीत, तिखट, क्रिस्पी, कुरकुरीत, गोड, आंबट, ठसका देणारे आणि बरंच काही. ही विशेषणे लागू पडणारा पाणीपुरी हा एकच पदार्थ आपल्या नजरेसमोर येतो. समस्त भारतीयांच्या जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे पाणीपुरीची. त्यातही गंमत अशी की, भारताच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरी आहे. तिची नावं भिन्न, बनवण्याची पद्धत वेगळी आहे तरी संपूर्ण भारतभरात अतिशय चवीने, आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो. काही पदार्थ घरीच खावे या वर्गातले असतात, तसे काही पदार्थ बाहेरच खावेत आणि या वर्गात पाणीपुरी मोडते. मात्र हल्ली सर्वच जण आपली शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी ‘डाएट’ करतात. अशावेळी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पूर्णत: वज्र्य केले जाते. मात्र पाणीपुरी हा असा पदार्थ आहे, ज्याला पाहून मोह आवरणे कठीण होऊन जाते. यावर तोडगा म्हणून कल्याण येथील महावीर भेलपुरी कॉर्नरच्या प्रेम गुप्ता यांनी डाएट पानीपुरी तयार केली असून ही पानीपुरी खाण्यासाठी दूरदूरहून खवय्ये गर्दी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोल गोल, छोटय़ा छोटय़ा, टम्म फुगलेल्या पुऱ्या, त्यांच्या पोटात भरलेले आंबट गोड पाणी. डाएट पाणीपुरीचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये रगडा (बटाटा आणि पांढऱ्या वाटाण्याची भाजी) नसून त्यामध्ये उकडलेले कडधान्य वापरले जातात. खासकरून उकडलेले मूग सर्वाच्या पसंतीस पडतात. या पाणीपुरीसाठी पुदिना, मिरची, कोथिंबीर घालून तयार केलेले झणझणीत तिखट पाणी पिणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्याचबरोबर खजूर आणि चिंचेचे आंबट गोड पाणी तर बच्चेकंपनीच्या आवडीचे. जसे जेवणाच्या शेवटी काहीतरी गोड खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही तर त्याचप्रमाणे चटकदार पाणीपुरी खाल्ल्यावर कुरकुरीत मसालापुरी तर हवीच. त्याशिवाय तोंडात चव रेंगाळायची कशी? त्यातल्या चाटमसालायुक्त आणि शेवयुक्त, खारट बटाटय़ाची चव शेवटपर्यंत जिभेवर रेंगाळत राहते.

डाएट पाणीपुरीव्यतिरिक्त येथे एक नावीन्यपूर्ण भेळचा प्रकार खवय्यांसाठी उपलब्ध आहे. तो म्हणजे पापडी भेल. नेहमीचीच कुरमुऱ्याची भेळ खाऊन कंटाळा आला असल्यास येथील पापडी भेळची चव नक्कीच चाखावी. शेवपुरीसाठी लागणारी कुरकुरीत पापडी कुसकरून त्यामध्ये रसरशीत कांदा, उकडलेला बटाटा, लिंबाचा आंबट रस घालून हे सर्व मिश्रण हवेत झेलून पुन्हा त्यात झणझणीत तिखट चटणी आणि चमचमीत गोड असे विविध चवीचे पदार्थ एकत्र करून ही लज्जतदार पापडी भेळ तयार केली जाते.

शहरातील प्रत्येक उपाहारगृहाच्या मेन्यूकार्डवर आपले अधिराज्य गाजविणाऱ्या सॅण्डविचने या पाणीपुरी कॉर्नरलाही सोडलं नाही. येथील खवय्यांच्या आग्रहास्तव प्रेम गुप्ता यांनी कॉनरच्या दुसऱ्या बाजूला सॅण्डविच तयार करण्यास सुरुवात केली. जगप्रसिद्ध सॅण्डविच आपल्या खवय्यांना देताना त्यामध्ये काहीतरी नवीन असायला हवे म्हणून प्रेम यांनी एक प्रयोग केला. आज येथे येणाऱ्यांच्या पसंतीच्या यादीतला हा पहिला पदार्थ बनला आहे. तो प्रयोग म्हणजे सर्वाच्या आवडीचे लेएर्स वेफर्स वापरून तयार केलेलं लेएर्स सॅण्डविच. याचे वैशिष्टय़ म्हणजे दोन थरांच्या या सॅण्डविचमध्ये एक थरात भाज्या आणि चीज तर दुसऱ्यामध्ये वेफर्सचा कुस्कर आणि मॅयोनिज वापरून तयार केलेला स्टफिंग. हे सॅण्डविच ग्रील मशिनमधून तावून-सुलाखून आल्यावर त्यावर स्प्रेडचीज आणि लेएर्स वेफर्सने सजावट केली जाते. वेफर्सच्या विविध चवींमुळे हे सॅण्डविच अनेकांच्या आवडीचे बनले आहे.

त्याचबरोबर येथे येणाऱ्या लहानांपासून मोठय़ापर्यंत सर्वाच्याच आवडीचे चॉकलेट सॅण्डविच. चॉकलेट सॅण्डविच खाताना त्याच्या पावाचा कुरकुरीतपणा आणि डार्क चॉकलेटची चव संपूर्ण जिभेवर पसरते. चीज चिली सॅण्डविच खाताना त्याचा आंबट-गोड स्वाद पिझ्झा आणि सॅण्डविचपेक्षा वेगळं काही तरी खाल्ल्याची अनुभूती देतो, तर पनीर, मशरुम चीज सॅण्डविचचे लेअर पाहूनच तुमचं पोट भरतं आणि शेवटी ते संपता संपत नाही. येथे मैदा आणि गहू असे दोन प्रकारचे ब्रेड वापरून सॅण्डविच तयार केले जाते.

इतके वैशिष्टय़पूर्ण प्रकार येथे मिळत असले तरी त्यांची किंमत अवाजवी नाही. साधे सॅण्डविच केवळ २५ रुपये आणि पनीर मशरुम सॅण्डविच ७० रुपयांना मिळते. त्यामुळेच की काय, आजूबाजूच्या परिसरातील गृहसंकुलांमधील मुलांची येथे गर्दी असते आणि व्यापारी वर्गही आवर्जून पार्सल मागवतात.

महावीर भेल पुरी

  • कुठे?कुठे- महावीर भेलपुरी, टी-२, शॉप नं. ३ आणि ४, महावीर नगरी टॉवर, गोकुळ नगरीच्या समोर, गंधार नगर, खडकपाडा, कल्याण (प.)
  • वेळ- सकाळी ११ ते रात्री १०