मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सध्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला नसल्याने त्यांच्यावर सुरुवातीच्या काळात टिका झाली होती. मात्र येत्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात महिला मंत्र्यांची संख्या मोठी असेल असे वक्तव्य भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. गुरूवारी अंबरनाथ शहरात महिला संपर्क अभियानाप्रसंगी त्या उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे: आर्थिक संकटात असलेल्या पालिकेवर पडणार सातवा वेतन आयोगाचा भार

भाजप महिला संपर्क अभियानाच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. शहरातील महात्मा गांधी विद्यालयात मेळाव्यात त्यांनी महिला कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरही भाष्य केले. येत्या मंत्रीमंडळ विस्तारात महिलांची संख्या मोठी असेल, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा- ठाणे: ठाकरे गटाला पाठिंबा देताच मुलावर आणि माझ्यावर गुन्हा दाखल; राजन राजे यांचा भाजप-शिंदे गटावर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्र्याच्या समावेश नव्हता. त्यामुळे या मंत्रीमंडळावर टिकाही झाली होती. त्यानंतर विस्तारात महिलांना स्थान दिले जाईल, अशी चर्चा सुरू होती. तर गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांनीही कोणतेही खाते द्या पण विस्तार करा, अशी विनंती केली होती. तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विस्ताराची शक्यता वर्तवली जाते. हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची अनेकांना आशा आहे. त्याच काळात चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच या मंत्रीमंडळात कोणकोणत्या महिला आमदारांची वर्णी लागते याकडेही लक्ष लागले आहे.