ठाणे – सायंकाळनंतर धूळ आणि धुरक्यात हरवून जाणाऱ्या शहरांत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असताना ठाणे जिल्ह्यात या प्रदूषणाचे नेमके मोजमापच होताना दिसत नाही. एकीकडे खासगी संस्था आणि संकेतस्थळांच्या लेखी जिल्ह्यातील बहुतांश भागांत हवेचा स्तर वाईट असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळांवर हवा समाधानकारक असल्याचे दिसत आहे. त्यातच सध्या हवेतील प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असताना या समाधानकारक शेऱ्यामागे लपवाछपवी नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात सरकारी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यासोबतच, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर पट्ट्यात इमारती उभारल्या जात आहेत. जिल्ह्यात कारखान्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे रस्त्यावर धुळधाण तसेच वायू प्रदूषण पसरते. मुंबई उपनगरातील गुणवत्ता वाईट अवस्थेत असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यामध्ये ३१ डिसंबेरला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरील हवेची गुणवत्ता समाधानकारक आणि मध्यम असल्याचे दर्शवित आहे. याउलट एक्यूआय डाॅट इन संकेतस्थळावर वाईट श्रेणीमध्ये दर्शवित होता. याचा अर्थ आरोग्यासाठी धोकादायक आहे.

BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Suspicion of allocation of Rs 50 crore to private developers under Pradhan Mantri Awas Yojana
प्रकल्प सुरू होण्याआधीच निधीचे वितरण? पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचे वाटप झाल्याचा संशय

हेही वाचा >>>बदलापुरात भाजपचा माजी नगरसेवक शिवसेनेत; वामन म्हात्रेंची खेळी, किसन कथोरेंना धक्का

ठाणे जिल्ह्यात घोडबंदर येथील कासारवडवली, तीन हात नाका, कळवा, नवी मुंबईतील कोपरी, महापे, शिळफाटा हा भाग अतिशय गजबजलेला असतो. या भागात वाहने, प्रकल्प आणि इतर बांधकामांची निर्मिती होते. परंंतु या भागात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळात आणि खासगी संस्थांकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामध्ये मोठी तफावत दिसून येते. प्रदूषणापासून बचावासाठी काही नागरिक डाॅक्टरांच्या सल्ल्याने मुखपट्टीचा वापरत आहेत. हवेच्या गुणवत्तेविषयी वातावरण संस्थेचे संस्थापक भगवान केसभट यांना विचारले असता, ठाणे जिल्ह्यात विविध सरकारी प्रकल्प आणि बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात वायु प्रदूषणामध्ये वाढ होते. ठाणे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणा अपुऱ्या आहेत. या यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांमधून खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. या विषयी ठाण्यात राहणाऱ्या योगेश गांगुर्डे यांना विचारले असता, रात्रीच्या वेळेत खोकल्याचा त्रास होतो. अनेकदा बाहेर धुरके पसरत असते असेही त्यांनी सांगितले.

शहर किंवा प्रदेशातील जाळ्याच्या व्याप्ती आणि तपशीलांमध्ये फरक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रांच्या स्थानांची संख्या कमी आहे. तसेच ते धोरणात्मक पद्धतीने ठेवले जातात. ज्यामुळे व्यापक दृष्टिकोन मिळतो. दुसरीकडे खासगी संस्थांकडून स्थानिक किंवा सूक्ष्म स्तरावर प्रदूषणाचे तपशीलवार निरीक्षण करणारे जास्त प्रमाणात सेन्सर उपलब्ध केले जातात. यामुळे प्रदूषणाचे केंद्र आणि अल्पकालीन वाढीचे निरीक्षण कराता येते. जे व्यापक आणि केंद्रीकृत प्रणालीने दुर्लक्षित झाले असते. दोन्ही अहवाल एकत्रित करून हवेच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनातील गुंतागुंत अधोरेखित होते आणि याचा समग्रपणे सामना करण्यासाठी विविध निरीक्षण पद्धतींची गरज असते. – रोनक सुतारिया, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेज.

हेही वाचा >>>डोंबिवली, कल्याणमध्ये वृक्ष प्रदूषित रोषणाई; पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा

– केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ठाणे शहरात कासारवडवली आणि उपवन भागात हवा तपासणी गुणवत्ता आहे. यातील कासारवडवली भागात हवेचा निर्देशांक ८५ इतका दर्शविला आहे. तर उपवन येथे ८२ इतका आहे. तर नवी मुंबई शहरातील ऐरोली, वाशी येथील कोपरीपाडा, महापे, नेरूळ, सानपाडा, नेरूळ सेक्टर १९, कळंबोळी आणि तळोजा या भागात यंत्र आहेत. यातील ऐरोली, नेरूळ सेक्टर १९ यंत्रणातून गुणवत्ता उपलब्ध झाली नाही. तर, उर्वरित भागात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०१ ते १५२ या मध्यम स्वरुपातील आहे. तर, भिवंडी शहरात गोकुळनगर या भागात केवळ एकच यंत्र असून येथील हवा मध्यम स्वरूपातील आहे. बदलापूर शहरात कात्रप भागात समाधानकारक गुणवत्ता आहे. तर कल्याणमधील खडकपाडा समाधानकार आणि पिंपळेश्वर मंदीर येथे मध्यम स्तरावर हवेची गुणवत्ता दर्शवित होती. मिरा भाईंदरमध्ये भाईंदर पश्चिमेला यंत्रणा असून येथेही मध्यम स्वरूपातील गुवत्ता होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकानुसार, ० ते ५० चांगली, ५१ ते १०० समाधानकार, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० वाईट, ३०१ ते ४०० अतिशय वाईट आणि ४०१ ते ५०० गंभीर स्तरावर मोजली जाते.

खासगी यंत्रणामधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक

– एक्यूआय डाॅट इन संकेतस्थळानुसार- ठाणे – १२१ (वाईट), भिवंडी ८५ (मध्यम), ऐरोली -१०३ (वाईट), महापे – १५२ (वाईट), कल्याण १०७ (वाईट) या स्तरावर नोंदविला आहे. एक्यूआय डाॅट इन या संकेतस्थळावर ० ते ५० चांगली, ५१ ते १०० मध्यम १०१ ते २०० वाईट, २०१ ते ३०० आरोग्यासाठी हानीकारक अशा निर्देशांकात मोजली जाते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थवरून हवेचा गुणवत्ता निर्देशांक तपासण्याचा प्रयत्न केला असता, या संकेतस्थळावर जुना तपशील दाखविला जात आहे. काही ठिकाणी अहवालच उपलब्ध नसल्याचे दर्शविले जात आहे. त्यामुळे मंडळाकडून हवेची गुणवत्ता राखण्याबाबत जबाबदारीचे भान विसरले जात आहे का असा प्रश्नही पर्यावरणवादी विचारत आहेत.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

आमच्या दवाखान्यात सर्दी आणि खोकल्याच्या आजार असलेल्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये बालके आणि वृद्धांचा सामावेश अधिक आहे. घरामध्ये असूनही खोकला असले तर नक्कीच वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. – डाॅ. सी.एस. पाटील, यशोधननगर.

Story img Loader