मुंबई महापालिकेकडून मिळालेले वाढीव पाणी देऊन कोपरीतील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या कायम असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पथकाने त्या भागात केलेल्या पाहाणीमध्ये जुन्या आणि नवीन जलवाहिन्यांची जोडणी करण्यात आलेली नसल्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याची बाब समोर आली असून या जलवाहीन्या जोडणीची कामे पालिकेच्या पथकाने हाती घेतल्यामुळे कोपरीतील पाणी टंचाईची समस्या लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवली : विद्यार्थ्याला बस चालकाने २५ मीटर फरफटत नेले

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांकडून दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे. यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तर मुंबई महापालिकेकडे २० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानंतर भातसा आणि बारवी धरणातून टप्प्याटप्प्याने वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेकडूनही वाढीव पाणी पुरवठा उपलब्ध झालेला आहे. या वाढीव पाण्याचे कोपरी, आनंदनगर भागासाठी ६ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट विभागासाठी ११ दशलक्षलीटर आणि किसननगर, भटवाडी भागासाठी ३ दशलक्षलीटर याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. वाढीव पाणी पुरवठ्यानंतर कोपरीतील काही भागात पाणी टंचाईची समस्या कायम असल्याचे दिसून येते. आनंदनगरचा काही भाग, गांधीनगर, केदारेश्वर, सिद्धार्थ नगर तसेच पारशेवाडी या परिसरात पुर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही इमारतींना करद्वारे पालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या बाबत तक्रारी पुढे येताच पालिकेच्या पथकाने कोपरी भागाची पाहाणी केली. त्यात काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी का येते, याची पाहाणी केली. त्यात जुन्या आणि नवीन जलवाहिन्यांची जोडणी करण्यात आलेली नसल्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या जलवाहीन्या जोडणीची कामे पालिकेच्या पथकाने हाती घेतली असून यामुळे कोपरीतील पाणी टंचाईची समस्या लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली : खंबाळपाडा भोईरवाडीतील रस्त्यासाठी २०१४ मध्ये चार कोटी मंजूर ; रहिवाशांचा अजूनही खड्ड्यातून प्रवास

मुंबई महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या वाढीव पाण्याचा पुरवठा कोपरी भागात करण्यात येत आहे. परंतु काही भागांमध्ये जुन्या आणि नवीन जलवाहिन्यांची जोडणी करण्यात आलेली नसल्यामुळे त्याठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची बाब पाहाणीदरम्यान निदर्शनास आली आहे. त्यामुळे जलवाहीन्यांच्या जोडणीची कामे सुरु करण्यात आली असून यामुळे कोपरीतील सर्वच भागात योग्यप्रमाणात पाणी पुरवठा होईल. – विनोद पवार ,उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग,ठामपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The problem of water scarcity in the corner will be solved soon amy