ठाणे : नवी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ करण्यात आलेल्या ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगरातून ६२३ विशेष बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती.  यामुळे शहरांमध्ये बस गाडय़ांचा तुटवडा निर्माण झाल्याने बस थांब्यांवर लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. एकूण शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र दिसून आले.

नवी मुंबई येथे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ आणि नारी शक्ती दूत अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ठाणे,   मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगरातून ६२३ विशेष बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती.

Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
K North Division office, K North Division office inauguration, mumbai, K North Division office mumbai,
मुंबई : के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत उद्घाटन
NMMT changed one route from Juhu village on Vashi Koparkhairane due to heavy traffic
प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय
pune balajinagar metro station
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३३५ पैकी १२५ बस गाडय़ा महिला वाहतुकीसाठी देण्यात आल्या होत्या. त्यातील ७५ बस गाडय़ा ठाणे जिल्हा परिषदेने घेतलेल्या असून त्याचे पैसे ते देणार आहेत. उर्वरित ५० बस गाडय़ा शहरातून सोडण्यात आल्या होत्या. तर २१० बस गाडय़ांची शहरात वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झालेले नाहीत, अशी माहिती ठाणे परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली. परंतु शहरात नेहमीपेक्षा कमी बस गाडय़ा रस्त्यावर असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस पुलावरील थांब्यावर १५ मिनिटे उशिराने बस धावत असल्याने थांब्यांवर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कधी नव्हे ते शक्य झालं…नवी मुंबई शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी मुक्त प्रवासाचा आनंद

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या ४२९ पैकी ११२ बस गाडय़ा महिला वाहतुकीसाठी देण्यात आल्या होत्या; परंतु त्याचा शहरातील प्रवासी वाहतुकीवर परिणाम झालेला नाही, अशी माहिती नवी मुंबई परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली. मात्र नवी मुंबई शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस गाडय़ाही महिला वाहतुकीसाठी तैनात करण्यात आल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली होती.

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या ९० पैकी ४७ बस गाडय़ा, मीरा-भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमाच्या ८० पैकी १५ बस गाडय़ा महिला वाहतुकीसाठी देण्यात आल्या होत्या. यामुळे शहरांमध्येही प्रवाशांचे हाल झाले.

लोकमान्यनगर भागात राहतो. ठाणे स्थानक परिसरात शिकवणीसाठी येतो. दररोज दुपारी ३.३० वाजता ठाणे सॅटिस पुलावरून लोकमान्यनगरला जाण्यासाठी बस पकडतो. परंतु शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता लवकरच बस थांब्यावर आलो; परंतु ३.५० वाजून गेले तरी बस गाडी आली नव्हती.  -रोनक जाधव, विद्यार्थी

Story img Loader