कल्याण: कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्याला समांतर परळीकर वखार ते डाॅ. म्हस्कर रुग्णालय दरम्यानचा आठ वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडून पुन्हा नव्याने पालिकेने रस्ता बांधण्यास सुरूवात केल्याने या भागातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अगोदरच दर्जेदार रस्ता बांधला असता तर ही वेळ पालिकेवर आली असती का, असे प्रश्न या भागातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
परळीकर वखार ते डाॅ. म्हसकर रूग्णालय दरम्यानचा सुमारे ५० ते ६० मीटरचा रस्ता आठ वर्षापूर्वी पालिकेने ठेकेदाराकडून काँक्रीटचा बांधून घेतला होता. हे काम ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने आणि पालिकेने या रस्त्यावर योग्य देखरेख न ठेवल्याने या काँक्रिटच्या दणकट रस्त्याला भेगा पडल्या. काँँक्रीटचे रस्त्याचे तुकडे वाहनांच्या वर्दळीत निघू लागले. या रस्त्यासाठी पालिकेने लाखो रूपयांचा खर्च करून तो पाण्यात घालविला, अशी टीका त्यावेळी नागरिकांकडून केली जात होता.
हेही वाचा… शिळफाटा पुन्हा चर्चेत, बेशिस्त वाहन चालकांमुळे होत आहे वाहतूक कोंडी
देयक रोखले
परळीकर वखार ते म्हसकर रुग्णालयादरम्यानचा रस्ता ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने या ठेकेदाराचे या कामाचे देयक रोखून धरले आहे. हा रस्ता खराब झाल्याने त्याची नव्याने बांधणी करण्याचे नियोजन बांधकाम विभागाने केले आहे. या कामासाठी शासकीय निधी वापरण्यात येणार आहे. हा काँँक्रीट रस्ता जेसीबीच्या साहाय्याने फोडून ठेवण्यात आला आहे. या भागातील शाळकरी मुलांचे, ज्येष्ठ, वृध्दांचे या कामाने सर्वाधिक हाल होत आहेत. या रस्त्याचे काम दर्जेदार केले असते तर पुन्हा या रस्ते कामासाठी निधी खर्च करण्याची वेळ पालिकेवर आली नसती, असा संतप्त सूर या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.
या कामावर देखरेख अभियंता म्हणून अवधूत मदन कार्यरत आहेत. त्यांना संपर्क केला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
परळीकर वखार ते म्हसकर रुग्णालयापर्यंत काँक्रीटचा रस्ता खराब झाला आहे. शासकीय निधीतून या रस्ते कामासाठी निधी मंजूर आहे. पंधरा दिवसात हे काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल. – जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.