कल्याण पश्चिमेतील खडकपाडा चौक येथे बुधवारी संध्याकाळी वाडेघर येथील चार ते पाच तरुणांनी लोखंडी सळई आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.रिक्षा चालक आणि आरोपी तरुण हे वाडेघर गावातील रहिवासी आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.जयेश परशुराम पाटील (३४, रा. वाडेघर) असे तक्रारदार रिक्षा चालकाचे नाव आहे. प्रवीण उत्तम वाळुंज (२८), युवराज उर्फ बाबू उत्तम वाळुंज (२६), उत्तम वाळुंज आणि इतर अनोळखी व्यक्ति या प्रकरणात आरोपी आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकला मद्यपी, श्वानांचा विळखा
पोलिसांनी सांगितले, रिक्षा चालक जयेश पाटील हे त्यांच्या दुचाकीवरुन बुधवारी संध्याकाळी वाडेघर येथील घरी चालले होते. खडकपाडा चौक येथे त्यांची दुचाकी आली, त्यावेळी आरोपी प्रवीण, बाबू आणि उत्तम हे एका रिक्षेमधून आले. त्यांनी तक्रारदार जयेश यांच्या दुचाकी समोर रिक्षा आणून उभी केली. तुम्ही मला का अडवता असा प्रश्न जयेश यांनी करताच तिन्ही आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी सळई, ठोशाबुक्क्यांनी जयेशला रस्त्यात पाडून मारहाण केली. त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपी पळून गेले.जयेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाडेघर परिसरात काही तरुण दहशतीचा अवलंब करुन मारहाणीचे प्रकार करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. के. गोडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.