डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकात कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मंद प्रकाशाचे पथदिवे लावले आहेत. या दिव्यांमधील एक दिवा मागील तीन महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे लुकलुक करत आहे. त्यामुळे मुख्य वर्दळीचा रस्ता अंधारात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकातील लक्ष्मी नारायण कृपा सोसायटी आणि माऊली चाळीच्या मध्य भागातील रस्त्यांवरील हा दिवा बंद आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेक तक्रारी या बंद दिव्या विषयी पालिकेत केल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत हे दिवे येत असल्याने त्याची दुरुस्तीही या विभागामार्फत केली जाते. त्यामुळे स्थानिक अधिकारी या तक्रारीची गंभीर दखल घेत नाहीत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>वाहन बंद पडल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडी

तक्रार केली की पालिकेचे तांत्रिक कर्मचारी येऊन तात्पुरती दुरुस्ती करुन निघून जातात. त्यानंतर काही वेळ दिवा सुस्थितीत लागतो. त्यानंतर पुन्हा तो उघडझाप करायला लागतो, असे रहिवाशांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसापूर्वी बिघडलेला दिवा पालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी काढून नेला होता. दुरुस्त करुन तो आहे त्या जागेवर पुन्हा बसविला. दोन दिवस सुस्थितीत चाललेला हा दिवा पुन्हा उघडझाप करत आहे.
अशाप्रकारचे अनेक दिवे शहराच्या विविध भागात बंद असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पालिकेने शहरात ३० हजाराहून अधिक एलईडी पथदिवे बसविले आहेत. यापूर्वीचे जुने दिवे काढून टाकण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>ठाण्यात नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात; एका महिन्यात कामे उरकण्याचे पालिका आणि ठेकेदारांपुढे आव्हान

पालिकेच्या विद्युत विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, स्मार्ट सिटीअंतर्गत नवे पथदिवे बसविण्यात आले असले तरी त्या तक्रारींची दखल विद्युत विभागाकडून घेतली जाते. अशाप्रकारे दिवा कोठे बंद असेल तर तो दुरुस्त करण्याची कार्यवाही तात्काळ केली जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The road is dark as the smart city lights are switched off at devichapada in dombivli amy