कल्याण : लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रीय झाली आहे, असा खोटा मेसेज सोशल मिडीयावरील पसरवून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या विरोधात कल्याण झोन 3 चे पोलीस सक्रिय झाले आहेत. ही एक असून अफवा पसरविणाऱ्यांच्या शोध सुरु केला आहे असे सांगितले. कल्याण डोंबिवलीत सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल केला जात आहे. मुले चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. आज एका क्लाससमधून काही लोक मुलांना पळवून नेत असल्याचे दिसून आले. पण तिथल्या स्टाफच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
आपल्या सर्वाना विनंती आहे की, आपल्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवा असा मेसेज प्रत्येक मोबाईलवर दिसून येत आहे. अनेक लोकांनी हा मेसेज स्टेटसला ठेवलेला दिसून येत आहे. वास्तविक असे काही नाही मात्र ही अफवा एका चुकीच्या कथेमुळे सुरु झाली आहे. पालकांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहता कल्याण झोन ३ च्या पोलिसांनी सोशल मिडीयावरील या मेसेज शहानिशा केली असता हा मेसेज खोटा असल्याचे उघड झाले. ही केवळ अफवा असल्याचे उघड झाले असता कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी नागरिकांना आव्हान करत अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे .