Kalyan Crime News : एका ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर तिचा मुलगा तिच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. दोन दिवस तो मुलगा तिच्या मृतदेहाशेजारी बसला होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली आणि काहीतरीही वाईट घडल्याची शंका आली त्यामुळे त्यांमुळे त्यांनी पोलिसांना बोलवलं तेव्हा मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली. ही घटना कल्याणच्या ( Kalyan Crime ) खडकपाडा भागात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी ही घटना काय घडली?

सेल्विया डॅनियल ही महिला तिचा पती डॅनियल आणि १४ वर्षीय मुलगा ऑलविन यांच्यासह कल्याण ( Kalyan Crime ) पश्चिमेला असलेल्या खडकपाडा भागातल्या सुंदर कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्य करत होती. दोन दिवसांपूर्वी सेल्विया यांचे पती डॅनियल हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. सेल्विया आणि त्यांचा १४ वर्षांचा मुलगा ऑलविन हे दोघंच घरात होते. घरात झोपलेल्या सेल्विया यांचा झोपेतच मृत्यू झाला. मात्र त्याबाबत कुणालाही माहिती मिळाली नाही. १४ वर्षीय ऑलविनला आईचा मृत्यू झोपेतच झाला आहे याची कल्पनाच आली नाही. हा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता.

दुर्गंध सुटल्यानंतर घटना आली उघडकीस

Kalyan Crime सेल्विया डॅनियल यांचा मृत्यू त्या झोपेत असताना झाला. त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारीच बसून होता. त्याला आई गेल्याची काहीही कल्पना आली नाही. दोन दिवसांनी घरातून दुर्गंधी परसली त्यानंतर शेजाऱ्यांनी दार ठोठावलं. मात्र काहीही प्रतिसाद आला नाही. शेजाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराचं दार ठोठावलं. मात्र कुठलाही प्रतिसाद आला नाही. अखेर पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला. सेल्विया डॅनियल मृतावस्थेत पडल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा बसला होता. दोन दिवसांपासून तो बसून होता असं पोलिसांनी सांगितलं.

हे पण वाचा- Yashashree Shinde : प्रिय यशश्री, …तर तू वाचली असतीस गं!

पोलिसांनी केली ऑलविनची चौकशी

ऑलविनची या संदर्भात पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली. पण त्याची मानसिक अवस्था चांगली नसल्याचं समोर आलं. या मुलाने पोलिसांना काहीही प्रतिसाद दिला नाही. तो आईकडे बघत होता आणि तिच्या मृतदेहाजवळच बसून होता. पोलिसांनी सेल्विया यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्या मुलाने फक्त इतकंच सांगितलं की माझी आई गेली आहे. बाकी त्याला काहीही नीट सांगता आलं नाही. या मुलाला आईच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसला असावा त्यामुळे तो तिथे बसून राहिला असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

कल्याणमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. ज्यानंतर तिचा मुलगा या मृतदेहाजवळच दोन दिवस बसून होता ही बाब समोर आली आहे. (प्रतिनिधिक फोटो)

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

( Kalyan Crime ) खडकपाडा पोलिसांनी यासंदर्भात ही माहिती दिली की आम्ही या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शेजाऱ्यांनी आम्हाला जी तक्रार दिली त्यानंतर आम्ही ही नोंद केली आहे. तसंच आम्ही महिलेच्या मुलाचा आणि शेजाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. सेल्विया यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण कळू शकणार आहे. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना या घटनेमुळे ( Kalyan Crime ) धक्का बसला आहे. तसंच १४ वर्षांचा ऑलविन हा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ कसा काय बसून राहिला? याबाबतही आश्चर्य व्यक्त होतं आहे. तसंच या मुलाला मृतदेहामुळे येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास कसा झाला नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलिसांनी जे दृश्य घरात प्रवेश केल्यावर पाहिलं त्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटलं असं पोलिसांनी म्हटलं आहे. झी न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The son stayed near the dead body of his mother for two days police also surprised scj